अ‍ॅपशहर

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आईला ठार मारण्याची धमकी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. घरात कुणी नसल्याची संधी साधत त्याने मुलीवर बलात्कार केला. तसेच त्याच्या आईला ठार मारण्याची धमकी दिली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Sep 2020, 11:43 am
म. टा. प्रतिनिधी,औरंगाबाद: घरात कोणी नसल्याची संधी साधत घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शेळीच्या व्यापाऱ्याला वडोदबाजार पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. युनूस अब्दुल शाह (वय ३२, रा. पिंपळगाव कोलते ता. भोकरदन जि. जालना) असे त्याचे नाव आहे. त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. कुलकर्णी यांनी बुधवारी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आईला ठार मारण्याची धमकी


या प्रकरणात पीडितेच्या आईने फिर्याद दिली. त्यानुसार १४ सप्टेबर रोजी सकाळी नऊ वाजता त्या कामानिमित्त तहसील कार्यालयात गेल्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास संशयित आरोपी युनूस शाह हा फिर्यादीच्या घरी आला. त्याने पीडितेला व पीडितेच्या भावांना चॉकलेट व बिस्किट दिले. त्यानंतर पीडितेवर बलात्कार केला. पीडिता ओरडत करत बाहेर पळाल्याने आरोपी कपडे घालत तिच्यामागे बाहेर आला व कोणाला काही सांगितल्यास तुझ्या आईला ठार मारीन अशी धमकी देऊन निघून गेला. फिर्यादी दुपारी घरी आल्यानंतर पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. या प्रकरणात वडोदबाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता विशेष सरकारी वकील राजू पहाडिया यांनी आरोपीची वैद्यकीय तपासणी, गुन्ह्यावेळी वापरलेले कपडे जप्त करणे, त्याला गुन्ह्यात कोणी मदत केली याचा तपास करण्यासाठी पोलिस कोठडी देण्याची विनंती केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने कोठडीचे आदेश दिले.

आणखी बातम्या वाचा:

३ दिवस बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह सापडला; वर्गमित्रानेही केली आत्महत्या बार लुटणाऱ्यांची अर्धनग्न धिंड, महाराष्ट्र पोलिस जिंदाबादच्या घोषणासंतापजनक! पत्नी लठ्ठ आहे म्हणून पतीने छळ केला, घराबाहेर काढले'गुड्डी'नं कॉल करून डेटवर बोलावलं; तिथलं दृश्य बघून तो हादरलाच!बॉयफ्रेंडकडून मोबाइल रिचार्ज; दुसऱ्याशी बोलायची; हॉटेलमध्ये महिलेची हत्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज