अ‍ॅपशहर

गँगस्टर इकबाल मिर्चीचे मुंबईतील हॉटेल, टॉकीजसह २२ कोटींची मालमत्ता जप्त

कुख्यात दाऊद इब्राहिमचा साथीदार गँगस्टर इकबाल मिर्ची आणि त्याच्या कुटंबीयांची २२ कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त मालमत्तांमध्ये मुंबई आणि पाचगणीतील मालमत्तांचा समावेश आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2020, 4:56 pm
मुंबई: डीएचएफएल प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अंडरवर्ल्ड डॉन इकबाल मिर्चीची २२ कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात मुंबईतील एक हॉटेल, एक सिनेमागृह तसेच पाचगणी येथील मालमत्तेचा समावेश आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गँगस्टर इकबाल मिर्चीचे मुंबईतील हॉटेल, टॉकीजसह २२ कोटींची मालमत्ता जप्त


पीएमएलए अंतर्गत मालमत्ता जप्तीच्या दिलेल्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीने मंगळवारी दिली. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये मुंबईतील टॉकीज (सिनेमागृह) आणि एका हॉटेलचा समावेश आहे. तसेच फार्म हाऊस, दोन बंगल्यांसह पाचगणीमधील साडेतीन एकर जमिनीचा समावेश आहे, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. जप्त केलेल्या मालमत्तेची अंदाजे किंमत २२.४२ कोटी रुपये आहे. त्यात सात बँक खात्यांमधील ठेवींचाही समावेश आहे.


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार आणि कुख्यात गुंड इकबाल मिर्चीचा लंडनमध्ये २०१३ मध्ये मृत्यू झाला होता. सप्टेंबरमध्ये त्याची आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची विदेशातील जवळपास २०० कोटींची मालमत्ता जप्त केली होती. पीएमएलए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. जप्त केलेल्या मालमत्तेत मिर्चीच्या कुटुंबातील सदस्यांच्या १५ व्यावसायिक आणि निवासी मालमत्ता आहेत. वाधवान बंधूच्या मालकीच्या दुबईतील कंपनीने ही संपत्ती मिर्ची कुटुंबाला हस्तांतरित केली होती. आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर असलेला इकबाल मिर्ची याने देश-विदेशात अचल संपत्ती आणि व्यावसायिक मालमत्ता मिळवली होती. मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी त्याने मालमत्ता खरेदी केली होती.

दारू पिण्यास विरोध केल्याने पेव्हर ब्लॉकने दोघांची डोकी फोडली

कॅनडातून लोणावळ्यात टपालाद्वारे पाठवले ५५ लाखांचे ड्रग्ज पार्सल

बहिणीची छेड काढली; भावाने 'त्याला' पार्टीच्या बहाण्याने चौकात नेले, त्यानंतर...

पुणे: पोलिसाचा स्वतःवर गोळी झाडण्याचा प्रयत्न, झटापटीत ट्रिगर दाबला अन्...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज