अ‍ॅपशहर

मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना अटक

डबेवाल्यांच्या नावाने कर्ज घेऊन त्यांना पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांना मुंबईतील घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी त्यांना अटक केली.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jan 2021, 2:32 pm
मुंबई: मुंबई डबेवाला संघटनेचे (Mumbai Dabbawala Association) अध्यक्ष सुभाष तळेकर यांना घाटकोपर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्यांच्याविरोधात फेब्रुवारी २०२० मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. २२ डबेवाल्यांच्या नावावर कर्ज घेतल्यानंतर त्यांना पैसे दिले नव्हते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम subhash-talekar : सुभाष तळेकर यांना अटक


मुंबईत विविध कार्यालये आणि शाळांमध्ये जेवण पोहोचवणाऱ्या मुंबई डबेवाला संघटनेबाबत सध्या जोरदार चर्चा आहे. संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, त्यांना घाटकोपर पोलिसांनी अटक केली आहे.

तळेकर यांना अटक करण्यात आली असून, त्यांना विक्रोळी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. तळेकर यांनी पाच वर्षांपूर्वी २२ डबेवालांची फसवणूक केली होती. त्यांच्या नावावर कर्ज घेतले होते. मात्र, त्यांना पैसे दिलेच नसल्याचे स्पष्ट झाले होते. वसुलीच्या नोटिसा आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले होते.

अपहरण प्रकरण: माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह २८ जणांवर गुन्हा

२०१५ मधील हे प्रकरण आहे. सुभाष तळेकर आणि इतर आरोपींनी काही डबेवाल्यांना दुचाकी मोफत देण्याचे प्रलोभन दिले होते. त्यांच्याकडून अर्ज भरून घेतले होते. तसेच इतर कागदपत्रेही घेतली होती. त्यांच्याकडून सह्या घेतल्या होत्या. मात्र, बरेच दिवस झाले तरी दुचाकी मिळाल्या नाहीत. त्यांनी दुचाकींची मागणी केली. काही तक्रारदारांकडे नोटिसा आल्या. तुम्ही कर्ज घेतले असून, परत न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटिसांत नमूद केले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तळेकर यांच्याविरोधात घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज