अ‍ॅपशहर

मुंबईत मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश; अडीच कोटींचे अंमली पदार्थ आणि रोकड जप्त

मुंबईत एनसीबीने मोठ्या ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. दोघा ड्रग तस्करांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि रोकडही जप्त केली आहे.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Dec 2020, 4:01 pm
मुंबई: बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अंमली पदार्थ तस्करांविरोधात धडक कारवाई मोहीम हाती घेणाऱ्या एनसीबीच्या पथकाने मुंबईत मोठ्या ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. एनसीबीने ड्रग सप्लायर आणि तस्कर रेगल महाकाल याला अटक केली आहे. रेगल हा बऱ्याच महिन्यांपासून फरार होता. अटकेनंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आले. त्याला दोन दिवसांची एनसीबी कोठडी देण्यात आली आहे. रेगल हा अनुज केशवानी नावाच्या एका अन्य आरोपीला ड्रग पुरवत होता आणि अनुज दुसऱ्यांदा ते पुरवायचा, अशी माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबईत मोठ्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश; अडीच कोटींचे ड्रग्ज आणि रोकड जप्त


एनसीबीच्या पथकाने अंधेरीतील लोखंडवालामध्ये छापे मारले. यात मोठ्या प्रमाणात रोकड आणि अंमली पदार्थ आढळून आले. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर एनसीबीने याआधी अनेक जणांना ताब्यात घेतले होते. त्यात सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचाही समावेश होता. काही दिवसांपूर्वीच शौविक चक्रवर्तीला जामिनावर सोडण्यात आले आहे.

अडीच कोटींची मलाना क्रीम जप्त

एनसीबीने बुधवारी दोन ड्रग सप्लायरना अटक केली. त्यांच्याकडून ५ किलो मलाना क्रीम जप्त करण्यात आली आहे. त्याची किंमत २.५ कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. तर १३ लाखांची रोकडही जप्त केली आहे.

पुणे: १३ वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी आचाऱ्याला १० वर्षांची शिक्षा मुंबईची 'लेडी डॉन' पुन्हा अटकेत; ३ हस्तकांनाही पोलिसांनी ठोकल्या बेड्या जळगाव: 'त्या' आदर्श शिक्षकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; घातपाताचा संशय

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज