अ‍ॅपशहर

Mumbai Crime: मुंबईत भररस्त्यात थरार; तृतीयपंथीयाची दिवसाढवळ्या हत्या

मुंबईत भररस्त्यात तृतीयपंथीयाची हत्या करण्यात आली. गोरेगाव पश्चिमेकडील लिंक रोडवर ही धक्कादायक घटना घडली. बांगुरनगर पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2021, 6:00 pm
मुंबई: मुंबईतील गोरेगाव पश्चिमेकडे दिवसाढवळ्या भररस्त्यात एका तृतीयपंथीयाची निर्घृण हत्या करण्यात आली. बुधवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. बांगुरनगर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. तिघा जणांनी हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Mumbai Crime: मुंबईत भररस्त्यात थरार; तृतीयपंथीयाची दिवसाढवळ्या हत्या


सुरेश उर्फ सुऱ्या मस्तुद (वय ३८) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. मस्तुद हा धडक किन्नर मुंबई असोसिएशनचा पदाधिकारी होता. अन्य एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बुधवारी त्याची बैठक होती. एका हॉटेलात ही मिटिंग झाली. ती आटोपल्यानंतर मस्तुद हा साधारण सव्वातीन-साडेतीनच्या सुमारास निघाला.

हे तर टोलराक्षस! खेडशिवापूर टोलनाक्यावर वाहनचालकांची लूट, स्टिंग ऑपरेशनद्वारे पर्दाफाश

भगत सिंग नगर झोपडपट्टीजवळील लिंक रोडवरून जात असताना, तिघांनी मस्तुदला अडवले. त्यांनी त्याच्यावर चाकू आणि हातोड्याने वार केले. हल्ला केल्यानंतर तिघेही पसार झाले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मस्तुदला रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज