अ‍ॅपशहर

घटस्फोटित महिलेवर पोलिसाने केले अत्याचार, अश्लील व्हिडिओ केला शूट

घटस्फोटित महिलेला गुंगीचे औषध देऊन बेशुद्धावस्थेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच त्याचा व्हिडिओ काढून व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलीस शिपायाला अटक केली आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2020, 2:53 pm
नागपूर: गुंगीचे औषध देऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत ३३ वर्षीय घटस्फोटित महिलेचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अत्याचार करणाऱ्या पोलिसाला अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम घटस्फोटित महिलेवर पोलिसाने केले अत्याचार, अश्लील व्हिडिओ केला शूट


विक्रमसिंग जगतसिंग बनाफर (वय ३०, रा. नर्मदा कॉलनी, फ्रेण्ड्स कॉलनी),असे अटकेतील पोलीस शिपायाचे नाव आहे. तो पोलीस मुख्यालयात तैनात आहे. ३३ वर्षीय महिला खासगी कंपनीत लिपिक आहे. ती घटस्फोटित असून, अंबाझरी परिसरात राहाते. याच कंपनीत विक्रमसिंग हा कामाला होता. त्यामुळे तो महिलेला ओळखायचा. २०१६ मध्ये तो पोलीस दलात रूजू झाला. पोलीस झाल्यानंतर विक्रमसिंग याने महिलेसोबत ओळख वाढवली. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवले. २०१७ मध्ये पीडित महिलेसह तो बेलतरोडीतील श्रीकृष्णा एनक्लेव्ह येथे राहणाऱ्या मित्राच्या फ्लॅटवर आला. तिथे महिलेला नाश्त्यातून गुंगीचे औषध दिले. ती बेशुद्ध झाली. विक्रमसिंग याने तिच्यावर अत्याचार केले. मोबाइलद्वारे अत्याचाराची चित्रफितही काढली. ही चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देऊन तो महिलेचे वारंवार शोषण करायला लागला. सहा महिन्यांपूर्वी विक्रमसिंग याचे लग्न झाले. लग्नानंतर तो महिलेला आणखी त्रास द्यायला लागला. त्रास असह्य झाल्याने पीडित महिलेने बेलतरोडी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अत्याचार व अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून विक्रमसिंग याला अटक केली.

आणखी बातम्या वाचा:

धक्कादायक! पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना

डान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...

पालघर: तलासरीजवळ मध्यरात्री थरार, हॉटेलात गोळीबार करून लूट

पुणे: हिंजवडी आयटी पार्कमधील हॉटेलातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

धक्कादायक! डॉक्टर पती-पत्नी मध्यरात्री पुण्याकडे येत होते, ते थांबताच...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज