अ‍ॅपशहर

प्रेयसीचे अश्लील छायाचित्र व्हायरल, प्रियकराविरोधात गुन्हा

विवाहित प्रेयसीचे अश्लील फोटो नातेवाइकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकून बदनामी केल्याप्रकरणी तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरच्या गिट्टीखदान पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Apr 2021, 3:08 pm
नागपूर : विवाहित प्रेयसीचे अश्लील छायाचित्र व्हायरल करणाऱ्या प्रियकराविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. किशोर मनोहर घाडगे, असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रेयसीचे अश्लील छायाचित्र व्हायरल, प्रियकराविरोधात गुन्हा


पीडित १९ वर्षीय तरुणीचे किशोर याच्यासोबत प्रेमसंबंध होते. यादरम्यान, त्याने तिचे अश्लील छायाचित्र काढले. डिसेंबर महिन्यात पीडित तरुणीचे अन्य एका तरुणासोबत लग्न झाले. तिने किशोर याच्यासोबत संबंध तोडले. त्यामुळे किशोर संतापला. त्याने तरुणीचे अश्लील छायाचित्र तिच्या नातेवाइकांच्या व्हॉट्सअॅपवर व्हायरल केले. तरुणीला याबाबत माहिती मिळाली. तिने गिट्टीखदान पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून किशोर याला अटक केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज