अ‍ॅपशहर

Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड

रुग्ण दगावल्याने त्याच्या नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि नर्सला मारहाण केली. तसेच रुग्णालयात तोडफोड केली. नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात हा प्रकार घडला.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Oct 2020, 12:41 pm
नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयात तोडफोडही केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड


वाशी येथे रुग्णालयात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. जुहू गावातील एका रुग्णाला उपचारासाठी वाशी येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रुगणाच्या नातेवाइकांनी संतप्त होऊन रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना शिवीगाळ करून मारहाणही केली. तसेच रुग्णालयात तोडफोड केली. यात रुग्णालयातील अनेक उपकरणांचे नुकसान झाले आहे.

दरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, वाशी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन काही जणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

करोनाची पु्न्हा बाधा होण्याचा धोका; अॅण्टीबॉडीबाबत मोठा दावा! नागपूरमध्ये मोठी कारवाई; लाखोंचे एमडी जप्त धक्कादायक! १० वर्षांच्या बहिणीवर चुलत भावाने केला बलात्कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज