अ‍ॅपशहर

गर्लफ्रेंडच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावला, चिडलेल्या प्रियकराने केले 'हे' भयानक कृत्य

लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्याने तरुणाने गर्लफ्रेंडच्या वडिलांची हत्या केली. नवी दिल्लीतील सोनिया विहार परिसरात ही घटना घडली. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, पोलिसांनी त्याला अटक केली.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2020, 12:56 pm
नवी दिल्ली: नवी दिल्लीच्या सोनिया विहार परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. २५ वर्षीय तरुणाने प्रेयसीच्या वडिलांची हत्या केली. त्यांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्याने तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गर्लफ्रेंडच्या वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव धुडकावला, चिडलेल्या प्रियकराने केले हे भयानक कृत्य


मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय विजेंदर सिंह यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर जखमांच्या खूणा होत्या. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तपास सुरू केला. सिंह यांच्या दत्तक मुलीचे स्थानिक तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यांच्या नात्याला घरच्यांचा विरोध होता.

सूरज कुमार या तरुणाने सिंह यांची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. सूरज हा सोनिया विहार येथील रहिवासी आहे. तो पालम मेट्रो स्टेशनमध्ये हाऊसकीपर म्हणून काम करतो. आरोपीने चाकूने सिंह यांच्यावर वार केले. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर कुकरने वारंवार प्रहार केले. यात त्यांचा मृत्यू झाला.

आरोपी फरार होण्याच्या तयारीत असतानाच, त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशी केली असता, त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्याने त्यांच्या हत्येचा कट रचला होता. २८ नोव्हेंबरपासून सिंह दाम्पत्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले होते, असे आरोपीने कबूल केले.

भयंकर! पतीसमोरच १७ जणांनी केला पत्नीवर बलात्कार; झारखंड हादरले २० दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी परतला होता, त्यानंतर त्यानं...नवी मुंबई: बंद फ्लॅटचे दार उघडले; आतले दृश्य बघून महिला हादरलीच!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज