अ‍ॅपशहर

धक्कादायक! मालेगावात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

एका पोलीस उपनिरीक्षकानं स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज मालेगावमध्ये घडली. या घटनेनं संपूर्ण मालेगाव शहर हादरून गेलं आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलं नाही.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2020, 6:31 pm
मालेगाव: शहरातील पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रिडर पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने गोळी झाडून आत्महत्या केली. आज शनिवारी दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील पोलीस दल संकटाशी लढा देत असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम malegaon police suicide


शहरावर सध्या करोनाचे सावट असून त्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सातत्याने मालेगाव दौऱ्यावर असून, शनिवारी पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंग मालेगावात असताना हा प्रकार घडला. सायंकाळी सिंग यांच्या उपस्थितीत शहर पोलीस ठाणे येथील सुसंवाद हॉल येथे करोनासंदर्भात सर्वपक्षीय नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक सुरू होती. याचवेळी या सभागृहाच्या आवारात अचानक गोळी झाडल्याचा आवाज झाला. यावेळी बैठकीतून वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख बाहेर आले असता, महिला समुपदेशन केंद्रासमोरील झाडाखाली पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले.

अचानक घडलेल्या या घटनेने मालेगाव पोलीस दल हादरून गेले आहे. अजहर यांनी स्वतःवर गोळी झाडून का घेतली, यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच मालेगाव दौऱ्यावर असलेले विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

करोनाच्या भीतीनं नाशिकमध्ये तरुणाचा गळफास

...अन् चिमुरड्यानं आईच्या कुशीतच सोडला प्राण!

अकोल्यात करोनाबाधितानं चिरला स्वत:चा गळा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज