अ‍ॅपशहर

पुण्यात मद्यपींकडून वाहनांची तोडफोड

पुण्यातील जनवाडी परिसरात तिघा जणांनी रस्त्यालगत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 May 2020, 10:40 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जनवाडी परिसरात मंगळवारी रात्री उशिरा चार वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. दारू पिऊन आलेल्या तीन व्यक्तींनी ही तोडफोड केल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम crime news


याबाबत शामू लक्ष्मण धोत्रे (वय ४२, रा. जनवाडी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार आयान इनामदार व त्याच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्ररादार धोत्रे यांनी त्यांची रिक्षा जनवाडीतील मॅफको कंपनीजवळ रस्त्याच्या कडेला उभी केली होती. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास आलेल्या आरोपींनी त्यांची रिक्षा व इतर कार अशा चार वाहनांच्या काचा फोडल्या. त्यानंतर ते पसार झाले. आरोपींनी मद्यपान केल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

मुंबई: वाइन शॉपवर डल्ला; लाखो रुपयांची दारू पळवली

नागपूर: आजाराला कंटाळून माय-लेकीची आत्महत्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज