अ‍ॅपशहर

पुणे: 'तो' मुलासाठी नोकरी शोधत होता, घडलं भलतंच

सरकारी नोकरी देण्याचे प्रलोभन देऊन एका व्यक्तीने २ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलाला पुण्यातील खडकी येथील दारूगोळा फॅक्टरीत नोकरीला लावण्याचे प्रलोभन तक्रारदाराला दिले होते.

महाराष्ट्र टाइम्स 13 Aug 2020, 3:29 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे: खडकी येथील दारूगोळा फॅक्टरीत नोकरी लावण्याच्या आमिषाने दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिल चंद्रकांत पाटील (वय ५०, रा. बिबवेवाडी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार संतोष रामचंद्र गाढवे (वय ४२, रा. गणेश पेठ, सातववाडा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: सरकारी नोकरीचे प्रलोभन, २ लाख रुपयांची फसवणूक


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराची आरोपीसोबत काही व्यक्तींच्या माध्यमातून ओळख झाली होती. तक्रारदार त्यांच्या मुलाच्या नोकरीसाठी प्रयत्न करत होते. त्या वेळी आरोपीने त्यांना 'खडकीतील दारूगोळा फॅक्टरीत नोकरी देतो,' असे सांगितले. त्यासाठी त्यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले; पण त्यांच्या मुलास नोकरी दिली नाही. तक्रारदार यांनी सतत पाठपुरावा करूनही आरोपीने दाद दिली नाही. शेवटी त्यांनी पैसे परत मागितले. मात्र, पैसेही परत केले नाहीत. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आणखी बातम्या वाचा:

पुणे: घरफोड्या करणाऱ्या चोरट्याकडून पोलिसावर चाकूहल्ला
मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्याने पतीनं स्वीकारण्यास दिला नकार
वृद्ध आईचा मुलाकडून छळ; ATM कार्ड हिसकावले, पेन्शन लाटली


महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज