अ‍ॅपशहर

पिंपरी: सकाळी भांडण, संध्याकाळी भररस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण

पुण्यातील पिंपरी परिसरातील पुनावळे येथे एका दाम्पत्याला भररस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. सकाळी झालेल्या भांडणाच्या रागातून ही मारहाण करण्यात आली. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Nov 2020, 12:00 pm
म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: सकाळी झालेल्या भांडणाच्या कारणावरून तीन जणांनी मिळून दाम्पत्याला रस्त्यात अडवून सायंकाळी बेदम मारहाण केली. ५ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता ताजणे वस्ती, पुनावळे येथे ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पिंपरी: सकाळी भांडण, संध्याकाळी भररस्त्यात अडवून दाम्पत्याला बेदम मारहाण


रेश्मा जुबेर अत्तार (वय ३०, रा. जांबे नेरे फाटा, ता. मुळशी) यांनी याबाबत रविवारी (८ नोव्हेंबर) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषिकेश कदम, देवा जमादार (दोघे रा. डांगे चौक), असिफ शेख (रा. भुजबळ वस्ती, पुनावळे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अत्तार आणि त्यांचे पती ५ नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता भाजी घेण्यासाठी रिक्षातून जात होते. त्या वेळी आरोपी कारमधून जात होते. आत्तार यांना पाहिल्यानंतर आरोपींनी अत्तार यांच्या पतीला आवाज देऊन थांबण्यास सांगितले. सकाळी झालेल्या वादाच्या कारणावरून तिघांनी मिळून अत्तार आणि त्यांच्या पतीला शिवीगाळ करून मारहाण केली. अत्तार यांच्या पतीला लोखंडी रॉड आणि अत्तार यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले. यात अत्तार यांच्या डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

महिलेचा विनयभंग करून डोळे केले निकामी; विकृताला अटक

TRP scam: रिपब्लिक टीव्हीच्या वितरण विभाग प्रमुखांना अटक फिल्मी स्टाइल चोरीने खळबळ, १८ लाखांचे दागिने लंपास

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज