अ‍ॅपशहर

पुण्यात मोठी कारवाई; ड्रग्ज, रोकडसह २० कोटींचा मुद्देमाल जप्त, कंपनी सील

पुण्यातील पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. ज्या कंपनीत ड्रग्ज तयार करण्यात आले होते, ती कंपनी आणि मशीन जप्त केले आहेत. तसेच आणखी तिघांना अटक केली आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Oct 2020, 10:01 pm
पुणे: पुण्यातील खेडमध्ये ७ ऑक्टोबरला मेफेड्रोन आणि रोकड असा २० कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका नायजेरियन व्यक्तीसह तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर रांजणगाव येथील बायोटेक कंपनीत मेफोड्रोन तयार केले होते. ती कंपनी सील केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुण्यात मोठी कारवाई; ड्रग्ज, रोकडसह २० कोटींचा मुद्देमाल जप्त, कंपनी सील


रांजणगाव येथील बायोटेक कंपनीत हे ड्रग्ज तयार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करून ही कंपनी सील केली आहे. या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सहा पथके स्थापन केली होती. या पथकांनी तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक केली. तर आतापर्यंत १२ जणांना अटक केली आहे. ज्या बायोटेक कंपनीत मेफेड्रोन तयार केले गेले, तेथील मशीनसह कंपनी सील करण्यात आली आहे.

पुण्यात ६२ हजारांचे एमडी जप्त

खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असलेल्या पोलिसांना पुण्यातील भवानी पेठ परिसरात एका व्यक्तीने एमडी विक्रीसाठी आणल्याची गुप्त माहिती खबऱ्यांकडून मिळाल्यानंतर, खंडणी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची तपासणी केली असता, ६१ हजार ८५० रुपये किंमतीचा १२ ग्रॅम ३७० मिली ग्रॅम एमडी असल्याचे आढळून आले. या व्यक्तीला अटक करून त्याच्याविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Surat: 'वर्क फ्रॉम होम' जीवघेणा ठरला; इंजिनीअरने केली आत्महत्या

त्र्यंबकेश्वरच्या माजी नगराध्यक्षांची दिवसाढवळ्या हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी

खळबळजनक! आत्याच्या नवऱ्याला तरुणाने जिवंत जाळले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज