अ‍ॅपशहर

लज्जास्पद! पुण्यात जम्बो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरसोबत सहकाऱ्यांचे अश्लील वर्तन

राज्यात कोविड केअर सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असतानाच, पुण्यातील शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Sep 2020, 1:16 pm
पुणे: पुण्यातील शिवाजी नगर कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या डॉक्टरसोबत सहकारी डॉक्टरांनीच अश्लील वर्तन करून विनयभंग केला. त्यामुळे कोविड केअर सेंटरमधील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लज्जास्पद! पुण्यात कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्टरचा सहकारी डॉक्टरांकडून विनयभंग


राज्यात करोनाचा कहर सुरू आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरसह राज्यात ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारले आहेत. या ठिकाणी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी दिवसरात्र रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच काही सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महिला आणि तरुणींचे विनयभंग किंवा त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. कोविड सेंटरमध्ये महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. राज्यातील अनेक नेत्यांनी हा मुद्दाही उपस्थित केला होता. त्यात आता पुण्यातही डॉक्टर महिलेच्या विनयभंगाची घटना उघडकीस आली आहे.

पुण्यातील शिवाजी नगर येथील कोविड केअर सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे तेथे काम करणाऱ्या सहकारी डॉक्टारांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी २५ वर्षीय महिला डॉक्टरने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी बातम्या वाचा:

कोल्हापुरात खळबळ! प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित तरुणींची हत्या

नागपुरात थरार! कुख्यात गुंडाची दिवसाढवळ्या धारदार शस्त्रानं हत्या

पुणे: महापालिकेच्या कार्यालयात तोडफोड, मनसे कार्यकर्त्यांना जामीन भिवंडी: एमआयएमच्या नेत्याला अटक, बिल्डरचे अपहरण आणि खंडणीचा आरोप

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज