अ‍ॅपशहर

पुणे: दरोड्याच्या तयारीत आली होती टोळी; भरदुपारी...

पुण्यातील पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील पाच जणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडील शस्त्रे आणि इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2021, 3:58 pm
पुणे: पुण्यातील डांगे चौकाजवळील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या. रविवारी भरदुपारी पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी दरोडेखोरांच्या टोळीतील पाच जणांना अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: दरोड्याच्या तयारीत आली होती टोळी; भरदुपारी...


मिळालेल्या माहितीनुसार, डांगे चौकाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर काही जण दरोडा टाकणार असल्याची माहिती रविवारी दुपारी पोलिसांना मिळाली. दरोडेखोरांच्या टोळीतील काही जण त्या ठिकाणी थांबले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला होता. त्याचवेळी काही जणांच्या हालचालींवर पोलिसांना संशय आला. त्यांनी पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली. त्यांच्याकडे शस्त्रे, दोर, मिरची पुड आदी दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य सापडले. पोलिसांनी ते ताब्यात घेतले आहे.

Arif bhujwala: ड्रग्ज प्रकरणी दाऊदच्या भावाचा जवळचा साथीदार एनसीबीच्या जाळ्यात

तुषार भरोसे (वय २२), सिद्धार्थ भगत (२१), प्रेमशीतल जानराव (१९), श्रीपाद उर्फ ओंक्या मारूती कामत (१८) आणि स्वप्नील चंदनशिवे (२२) अशी अटक केलेल्या पाच जणांची नावे आहेत. त्यांची कसून चौकशी केली असता, त्यांनी कबुली दिली असून, वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज