अ‍ॅपशहर

पुणे: उसने दिलेले पैसे मागितले; महिलेला पहिल्या मजल्यावरून ढकलले

पुण्यातील हडपसर भागात एका महिलेला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली ढकलून दिल्याची घटना घडली आहे. महिलेने उसने दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्यानं तरुणानं हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2020, 6:25 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे: उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून महिलेला पहिल्या मजल्यावरून खाली ढकलल्याची धक्कादायक घटना पुण्यातील हडपसरमध्ये घडली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. आरोपी तरुणाला हडपसर पोलिसांनी अटक केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम महिलेला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून ढकलले


हडपसरमधील माळेवाडीत ही खळबळजनक घटना घडली. सागर भीमराव तुपे (वय ३१, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी मंजू टिळेकर उर्फ मंजू वेताळ (वय २६, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सागर आणि मंजू एकमेकांना ओळखत आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरू होते. सागर याने मंजूकडून पैसे घेतले होते. दोन दिवसांपूर्वी सागर मंजूकडे गेला होता. त्यावेळी तिने उरलेले ४० हजार रुपये त्याच्याकडे मागितले. त्याचा राग आल्यामुळे सागरने मंजूला तुझ्यामुळे माझे नुकसान झाले आहे, असे म्हणत शिवीगाळ केली. त्यानंतर मंजू फोनवर बोलत असताना, सागरने तिला इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून खाली ढकलून दिले. यामध्ये तिचा पाय, मणका आणि कंबरेला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जाधव या घटनेचा तपास करत आहेत.

२२ वर्षांनंतर 'त्या' हत्येचं गूढ उकललं; विहिरीत सापडल्या अस्थी

ठाणे: दुहेरी हत्याकांडानं मीरा रोड हादरलं, बारमध्ये सापडले मृतदेह

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज