अ‍ॅपशहर

पुणे: बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामिनासाठी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न

आरोपीला जामीन मिळण्यासाठी पोलिसांनी अहवाल द्यावा यासाठी त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यातच आत्महत्येचा प्रयत्न केला. पुण्यातील येरवडा पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. या प्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2020, 6:52 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे: बलात्कार, विनयभंगाच्या आरोपाखाली गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जामीन मिळावा असा अहवाल पोलिसांनी द्यावा, यासाठी आरोपीच्या पत्नीने पोलीस ठाण्यातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अंगावर डिझेल ओतून घेत आत्महत्येचा प्रयत्न तिने केला. येरवडा पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या जामिनासाठी पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न


येरवडा पोलीस ठाण्याच्या परिसरात बुधवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले आणि तिला नोटीस बजावली आहे. पोलीस शिपाई प्रमिला पवार यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यावरून नगर रोड येथे राहणाऱ्या एका २९ वर्षीय महिलेच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'ते' फोटो दाखवून विवाहितेला केलं ब्लॅकमेल; पूर्वाश्रमीच्या प्रियकराला अटक

पुणे: 'तो' मुलासाठी नोकरी शोधत होता, घडलं भलतंच

मिळालेल्या माहितीनुसार, बलात्कार, विनयभंग प्रकरणी २०१९ मध्ये येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीच्या जामिनाबाबत न्यायालयात सुनावणीची तारीख आहे. या आरोपीला जामीन देण्यात यावा असा अहवाल पोलिसांनी द्यावा, यासाठी आरोपीची पत्नी बुधवारी पोलीस ठाण्यात आली होती. तिने सोबत लपवून आणलेल्या बाटलीत डिझेल होते. सायंकाळी सव्वापाच वाजताच्या सुमारास तिने बाटलीतील डिझेल अंगावर ओतून पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडताच पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला होता. यावेळी ड्युटीवर हजर असलेल्या महिला कर्मचाऱ्याने या महिलेला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. या महिलेला सीआरपीसी ४१ (१ ) (अ) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक एस. बी. बनसोडे हे करीत आहेत.

पुणे: घरफोड्या करणाऱ्या चोरट्याकडून पोलिसावर चाकूहल्ला

मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्याने पतीनं स्वीकारण्यास दिला नकार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज