अ‍ॅपशहर

प्रेमात अडकवून केलं लग्न; पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

कथित पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली होती. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Sep 2020, 8:26 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे: लग्न झालेले असताना त्याची माहिती लपवून एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरच्यांना माहिती न देता या दोघांनी रजिस्टर लग्न देखील केले. त्यानंतर या तरुणीने संबधित तरुणाचा मानसिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. कोंढवा परिसरात ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रेमात अडकवून केलं लग्न; पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या


कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाच्या कथित पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाच्या काकाने याबाबत कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना उंड्रीमध्ये २८ जूनला घडली होती. त्यावेळी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याचा तपास करून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. तरुण आणि तरुणीचे पाच वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. त्यातून त्यांनी गुपचूप रजिस्टर लग्न केले होते. मात्र, त्यांनी ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितले नाही. ते दोघेही आपापल्या घरी राहात होते.

ते दोघेही बाहेर भेटायचे. या भेटीदरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या तरुणीचे अगोदरच लग्न झाले होते. असे असताना तिने या तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते. या तरुणाला तक्रार करण्याची धमकी देऊन ती वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती. या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यावर ते देखील या तरुणाला मानसिक त्रास देत होते. या तरुणाच्या घरच्यांना याची माहिती नसल्याने त्यांनी त्याचे नात्यात लग्न ठरविले होते. ही गोष्ट त्याच्या कथित पत्नीला समजल्यावर तिने त्याला पळून जाण्यासाठी दडपण आणले. पळून आला नाही तर सर्व उघड करण्याची धमकी तिने दिली होती. याला कंटाळून या तरुणाने साखरपुड्याच्या आदल्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना या तरुणाच्या मित्रांकडून त्याचे रजिस्टर लग्न झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन घटनेच्या दिवशी या तरुणीचे पाच ते सहा फोन या तरुणाला आले होते, हे चौकशीतून समोर आले होते.

मुलीची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आईने केली सुटका

आईशेजारी झोपलेल्या एका तीन वर्षीय चिमुरडीचे मध्यरात्री अपहरण करण्यात आले. त्याचवेळी मुलीच्या आईला जाग आल्याने तिने अपहरणकर्त्यांचा पाठलाग करून आरडाओरडा करत नागरिकांच्या मदतीने मुलीची त्यांच्या तावडीतून सुटका केली. काही लोक धावून आल्याचे कळताच अपहरणकर्त्यांनी तेथून पळ काढला. आंबेगाव पठार परिसरात हा धक्कादायक प्रकार बुधवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला.

खळबळजनक! पनवेलच्या मोरबे धरणात महिलेचा मृतदेह

चक्रावून टाकणारी घटना; १२ वर्षांपूर्वी 'हत्या' झालेली तरुणी जिवंत सापडली

कोल्हापूर: कोविड सेंटरमधील करोनाबाधित महिलेचे दागिने चोरले

पुणे: पोलीस ठाण्यातच कॉन्स्टेबल आणि शिपाई भिडले, फाईलवरून हाणामारी

मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज