अ‍ॅपशहर

पुणे: तरूण मध्यरात्री दुचाकीवरून जात होता, अचानक...

पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरून दुचाकीवर जाणाऱ्या तरुणावर गोळीबार करण्यात आला. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Edited byShrikrishna kolhe | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2021, 10:26 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: कात्रज-कोंढवा रस्त्यावर पूर्ववैमनस्यातून दुचाकीस्वार तरुणावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे: तरूण मध्यरात्री दुचाकीवरून जात होता, अचानक...


विघ्नेश अशोक गोरे (वय २०, रा. एसआरए इमारत, लेकटाऊन, कात्रज) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या मांडीतून गोळी आरपार गेल्याने दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याने याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Umarkhed : नायब तहसीलदार, तलाठ्यावर वाळू माफियांचा प्राणघातक हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरे हा त्याचे मित्र अतुल दरेकर, इश्वर म्हस्के आणि एक मित्र असे वेगवेगळ्या दुचाकींवरून मध्यरात्री बाराच्या सुमारास कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन निघाले होते. त्यावेळी आरएमडी शाळेसमोर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोरेवर पिस्तुलातून गोळी झाडली. ती गोळी गोरे याच्या पायाला चाटून गेल्यामुळे तो जखमी झाला. या घटनेनंतर गोरे हा दुचाकीवरुन खडी मशीन चौकातील पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी निघाला. त्यावेळी दोन दुचाकीवरील आरोपींनी त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. गोळीबाराची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलांडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, शब्बीर सय्यद, दादाराजे पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. पूर्ववैमनस्यातून गोरेवर गोळीबार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज