अ‍ॅपशहर

पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, शहरात खळबळ

पुण्यात खळबळजनक घटना घडली आहे. युवा सेना पदाधिकाऱ्याची वार करून हत्या करण्यात आली. दीपक मारटकर असे या युवा नेत्याचे नाव आहे. पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर सपासप वार केले.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Oct 2020, 10:08 am
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. दीपक विजय मारटकर (वय ३६) असे खून झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे ते चिरंजीव होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुण्यात युवा सेना पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या, शहरात खळबळ


ही घटना शुक्रवारी मध्यरात्री एकच्या सुमारास गवळी अळी शुक्रवारपेठ परिसरात घडली. पाच ते सहा हल्लेखोरांनी मारटकर यांच्यावर धारदार हत्याराने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या मारटकर यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता, पहाटे दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. हल्ल्याचे नेमके कारण समजू शकले नाही .

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाच ते सहा हल्लेखोरांनी कोयता आणि चाकूने मारटकर यांच्यावर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. दीड ते दोन वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. रात्री जेवण करून दीपक बाहेर आले होते. दरम्यान आधीपासूनच दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. डोके, पाठ आणि छातीवर सपासप वार करून हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार झाल्याचे समजते. सर्व हल्लेखोरांनी मास्क लावला होता. मोटरसायकलवर नंबर प्लेट नव्हती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून हल्लेखोरांचा माग काढण्यात येत आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

बिहारमध्ये खळबळ; निवडणूक रणधुमाळीत भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

पुण्यात लॉजमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश डान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक... पुणे: हिंजवडी आयटी पार्कमधील हॉटेलातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज