अ‍ॅपशहर

धक्कादायक! वडिलांसाठी औषध आणायला गेलेल्या विधवा महिलेवर बलात्कार

आजारी वडिलांसाठी औषध आणायला घराबाहेर पडलेल्या विधवा महिलेचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील चुरूमध्ये घडली आहे. आरोपीने पीडित महिलेला १० दिवस डांबून ठेवले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jul 2020, 11:11 am
चुरू: राजस्थानच्या चुरू येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. काही गुंडांनी एका विधवा महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजारी वडिलांसाठी ३२ वर्षीय विधवा महिला औषध आणायला घराबाहेर पडली होती. आरोपींनी तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम राजस्थानमध्ये विधवा महिलेवर बलात्कार


या प्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. आरोपींनी हनुमानगढच्या पल्लूमध्ये १० दिवस तिला डांबून ठेवले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. आरोपी देवीलालसह अन्य तिघांविरोधात तिने तक्रार केली आहे. त्यानंतर पोलिसांनी पीडितेला रुग्णालयात नेले. तेथे तिची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली.

मुंबई: वांद्रे सी-लिंकवरून समुद्रात उडी मारून तरुणाची आत्महत्या

पर्दाफाश! मुंबईत लॉकडाउनमध्ये पैसे घेऊन दिले जात होते बोगस ई-पास


पतीच्या निधनानंतर वडिलांसोबत राहत होती

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पतीचा मृत्यू झाल्यानंतर महिला आपल्या वडिलांसोबत राहत होती. १५ दिवसांपूर्वी वडील आजारी झाले होते. त्यांच्यासाठी औषध आणण्यासाठी ती जात होती. त्याचवेळी आरोपी देवीलाल याने तिला जबरदस्ती गाडीत बसवले आणि सरदारशहर रस्त्यालगत असलेल्या एका घरात तिला नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपी तिला पल्लू येथे घेऊन गेला. १० दिवस त्या ठिकाणी डांबून ठेवले आणि तिच्यावर बलात्कार केला.

जीवे मारण्याची धमकी

बलात्कारानंतर महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपीचे नातेवाइक चहामध्ये नशेच्या गोळ्या टाकून तिला बेशुद्ध करत होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

नोकरासमोर अपमान करतो म्हणून नोकरांच्याच मदतीनं भावाचा खून

इतके पैसे देऊनही सासरच्यांकडून होणारा छळ थांबेना, शेवटी तिनं...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज