अ‍ॅपशहर

लॉकडाऊनचे 'साइड इफेक्ट्स'; सांगलीत लुटमारीच्या घटना वाढल्या

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लागू केलेल्या लॉकडाऊनचे परिणाम हळूहळू दिसू लागले आहेत. सांगलीत लूटमार, चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Aug 2020, 5:12 pm
म. टा. प्रतिनिधी, सांगली: करोना संसर्गामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सांगलीकरांवर आता लुटमारीचे नवे संकट कोसळले आहे. मोबाइल हिसकावणे, चेन स्नॅचिंग यानंतर आता थेट घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या टोळ्यांची दहशत वाढली आहे. वाढत्या बेरोजगारीमुळे येणाऱ्या काळात लुटमारीच्या घटना आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या घटना रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लॉकडाऊनचे साइड इफेक्ट्स; सांगलीत लुटमारीच्या घटना वाढल्या


करोना संसर्गामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. उद्योगधंदे, व्यवसायांवर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याने हजारो तरूण बेरोजगार झाले आहेत. अशा स्थितीत गुन्हेगारी कृत्ये वाढण्याचा धोका असतो. सांगलीत गेल्या महिनाभरात वाढलेल्या चोऱ्या आणि लूटमारीच्या घटनांमधून लॉकडाऊनचे 'साइड इफेक्ट्स' दिसू लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच चार तरुणांनी मार्केट यार्ड परिसरात एका ट्रकचालकास अडवून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाइल लांबवला. बिसूर-कवलापूर मार्गावर एका घरात घुसून वृद्धेला चाकूचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न केला. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास कोल्हापूर रोडवर दुचाकीस्वारास अडवून चाकूचा धाक दाखवत मोबाइल काढून घेतला.

थरार! पोलिसांनी केला गुंडाचा १२ किमी पाठलाग; दोन्ही बाजूंनी गोळीबार, नंतर...

न्यायनिवाडा करणाऱ्या पंचांनीच महिलेवर केला सामूहिक बलात्कार

वडापाव अडीच लाखांना पडला! घडलंच असं की...

घरफोडी, वाहन चोरी, चेन स्नेचिंग आणि मोबाइल लंपास करण्याचे प्रकारही वाढले आहेत. घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीही सुरक्षित नाहीत. सांगली शहरात रोज किमान तीन ते चार दुचाकी चोरीच्या तक्रारी दाखल होत आहेत. घरांच्या बांधकामांसाठी आणलेले साहित्य, शेतातील विद्युत पंप, शेडमधील जनावरे, पवनचक्क्यांचे साहित्य हातोहात लंपास केले जात आहे. यामुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. याबाबत पोलिसांनी वेळीच उपाययोजना न केल्यास येणाऱ्या काळात पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान निर्माण होऊ शकते. पोलिसांनी वेळीच रेकॉर्डवरील सराईत चोरट्यांवर नजर ठेवावी. नाकाबंदी करून गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

माहुलीतील घरफोडीचा लागला छडा

खानापूर तालुक्यातील माहुली येथे आठवड्यापूर्वी झालेल्या घरफोडीचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छडा लावला. घरफोडी करणारे शाम तारासिंग राठोड (वय २१, रा. पारवा, ता. पुसद, जि. यवतमाळ) आणि अश्विनी गणेश माने (रा. माहुली, ता. खानापूर) या दोघांना अटक केली. चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीतील सहा लाख ३४ हजार रुपये किमतीचे १८ तोळे दागिने हस्तगत केले.

टीव्ही पत्रकाराची हत्या; आधी लाठ्याकाठ्यांनी मारहाण, नंतर गोळ्या घातल्या

धक्कादायक! ७ वर्षीय मुलानं ४ वर्षांच्या मुलाचा चिरला गळा; मृत्यूशी झुंज

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज