अ‍ॅपशहर

सांगली: भूसंपादनावेळी राडा; शेतकऱ्याने कर्मचाऱ्याचे डोके फोडले

तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध केला असून, कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. गुहागर-विजापूर महामार्गासाठी भूसंपादनाचे काम सुरू आहे. त्याला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2020, 10:08 pm
म. टा. प्रतिनिधी, सांगली : गुहागर-विजापूर महामार्गासाठी (guhagar-vijapur highway) भूसंपादन केले जात असून, तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला. जमीन मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केले. गुरुवारी (ता. १३) दुपारी घडलेल्या या घटनेत भूसंपादन (land acquisition) करणारे कर्मचारी अनिल घोडेस्वार आणि उदय जगताप हे जखमी झाले. जखमींच्या फिर्यादीनुसार तासगाव पोलिसांनी महादेव काकासो घाडगे या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम तासगाव: शेतकऱ्यांनी भूसंपादनासाठी आणलेल्या मशीनची केली तोडफोड


तासगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुहागर ते विजापूर या महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. तासगाव तालुक्यात येळावी ते तासगाव कॉलेज दरम्यान काही शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हे काम रखडले आहे. थांबलेले काम पुन्हा सुरू करण्यासाठी भूमी अभिलेख विभाग, भूसंपादन विभाग आणि महामार्गाचे काम करणाऱ्या ध्रुव कन्सल्टन्सीचे कर्मचारी गुरुवारी दुपारी नेहरूनगर येथे पोहोचले. जमीन मोजणीचे काम सुरू करताच परिसरातील काही शेतकऱ्यांनी याला विरोध (farmer protest) केला. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतप्त झालेला शेतकरी महादेव घाडगे हा शिवीगाळ करीत कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. लोखंडी गजाने डोक्यावर प्रहार केला. यात भूसंपादन विभागातील कर्मचारी उदय जगताप जखमी झाले, तर अनिल घोडेस्वार या कर्मचाऱ्याला धक्काबुक्की केली. यानंतर त्याने जमीन मोजणीच्या मशीनचीही तोडफोड केली.

पत्नीने चहा करायला दिला नकार, पतीनं केलं भयानक कृत्य

'ते' फोटो दाखवून विवाहितेला केलं ब्लॅकमेल; पूर्वाश्रमीच्या प्रियकराला अटक


जखमी कर्मचाऱ्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. भूसंपादनास विरोध आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याबद्दल भूमी अभिलेख विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तासगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन महादेव घाडगे या शेतकऱ्याच्या विरोधात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी घाडगे याच्यावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचा आणि मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला.

पुणे: 'तो' मुलासाठी नोकरी शोधत होता, घडलं भलतंच मामाने केला बलात्कार, गरोदर राहिल्याने पतीनं स्वीकारण्यास दिला नकार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज