अ‍ॅपशहर

बारावीपर्यंत शिक्षण, मग BBAला ऍडमिशन, अनेक तरुणींशी संबंध; आफताबबद्दलची बरीच माहिती समोर

shraddha murder case: मुंबईजवळच्या पालघरमध्ये वास्तव्यात असलेल्या श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर आफ्ताब पुनावालानं (२८) हत्या केली. आफ्ताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते लपवण्यासाठी, त्यातून दुर्गंधी येऊ नये म्हणून फ्रिज आणला. त्यानंतर दररोज मृतदेहाचा एक तुकडा घेऊन आफ्ताब मध्यरात्री दोनच्या सुमारास घरातून बाहेर पडायचा आणि तुकडा जंगलात फेकून द्यायचा.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Nov 2022, 1:23 pm
पालघर: मुंबईजवळच्या पालघरची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकरची तिचा प्रियकर आफ्ताब पुनावालानं (२८) हत्या केली. आफ्ताबनं श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. ते लपवण्यासाठी, त्यातून दुर्गंधी येऊ नये म्हणून फ्रिज आणला. त्यानंतर दररोज मृतदेहाचा एक तुकडा घेऊन आफ्ताब मध्यरात्री दोनच्या सुमारास घरातून बाहेर पडायचा आणि तुकडा जंगलात फेकून द्यायचा. श्रद्धाची हत्या दिल्लीतील घरात झाली. श्रद्धाच्या कुटुंबियांनी प्रेमसंबंधांना विरोध केल्यानं श्रद्धा आफ्ताबसह दिल्लीत राहत होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aftab shraddha murder


आफ्ताबचं कुटुंब मुंबईत राहतं. आफ्ताब लहानपणीपासून अभ्यासात फार हुशार नव्हता. शिक्षणात त्याची प्रगती यथायथाच होती. त्याचं कुटुंब, नातेवाईक, मित्रांपैकी कोणाशीच भांडण नव्हतं. आफ्ताबनं उत्तम शिकावं अशी त्याचे वडील अमीन यांची इच्छा होती. मात्र आफ्ताबनं पदवीचं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याला व्यवसाय करायचा होता. आफ्ताबानं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करावं असं अमीन यांना वाटत होतं. मात्र आफ्ताबनं शिक्षण पूर्ण केलं नाही. तो दिल्लीला निघून गेला.
प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं, मग ३०० लीटरचा फ्रिज आणला; प्रियकर रोज रात्री दोनला निघायचा अन्...
आफ्ताब आणि श्रद्धा दिल्लीत लिव्ह-इनमध्ये राहत होते. आफ्ताबनं श्रद्धाची इतक्या निर्घणपणे हत्या केली यावर विश्वास ठेवणं त्याच्या मित्रांना आणि कुटुंबीयांना अवघड जात आहे. आफ्ताब अबोल होता. आयुष्यात काय करायचं याबद्दल त्याच्या डोक्यात स्पष्टता नव्हती. आफ्ताबचे वडीलदेखील त्याच्या भविष्याबद्दल चिंतेत असायचे. मात्र त्याच्या हातून असं काही घडेल यावर विश्वास ठेवणं कठीण आहे, असं त्याच्या एका कौटुंबिक मित्रानं सांगितलं.

आफ्ताब खोजा समाजाचा होता. श्रद्धासोबतच्या त्याच्या संबंधांना आफ्ताबच्या कुटुंबानं विरोध केला होता. आफ्ताबनं वसईतील एव्हरशाईन सोसायटीत असलेल्या एक फ्लॅट भाड्यानं घेतला. तो त्याच्या आई, वडील आणि लहान भावाच्या संपर्कात होता. मात्र श्रद्धा आणि त्यांची भेट कधीही झाली नव्हती.
पतीला शोधून द्या! पत्नी रोज गाऱ्हाणं मांडायची; ४ वर्षांनी पोलीस आले, घरात खोदकाम केले अन्...
२०११ मध्ये सेंट पीटर्स ज्युनियर महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर व्यवसाय करण्यासाठी तो पुण्याला गेला. काही महिन्यांत परत आला. बिझनेस व्यवस्थापन शिकण्यासाठी त्यानं सांताक्रूझमधील एका महाविद्यालयात BBA ला प्रवेश घेतला. मात्र त्यानं शिक्षण अर्धवट सोडलं.

आफ्ताब ग्राफिक डिझाइनर म्हणून काम करू लागला. २०१९ मध्ये एका डेटिंग ऍपच्या माध्यमातून त्याची ओळख श्रद्धाशी झाली. बाईक आणि ट्रेकिंग या दोघांच्या समान आवडी होत्या. त्यामुळे दोघांमधील जवळीक वाढली. आफ्ताब आणि श्रद्धानं लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानं सगळ्यांनाच धक्का बसला होता. आफ्ताब याआधीही रिलेशनशीपमध्ये होता, असं त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख