म. टा. वृत्तसेवा, ठाणे
मध्य रेल्वे मार्गावरील रेल्वे केबलची चोरी करणाऱ्या रॅकेटचा दिव्यात पर्दाफाश करण्यात आला आहे. तब्बल साडेतीन लाख रुपयांच्या रेल्वे केबलची चोरी करणाऱ्या आरोपींना आरपीएफ क्राइम इंटेलिजन्स ब्रांच, कल्याण विभागाचे पथक आणि दिवा आरपीएफ यांनी अटक केली. या संयुक्त कारवाईदरम्यान तिघा चोरट्यांना अटक करण्यात आली असून दोघे चोरटे फरार झाले आहेत.
वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीएफ क्राइम इंटेलिजन्स ब्रांचचे अमित राघव आणि दिवा आरपीएफचे आर. एस. मीना यांनी या गुन्ह्याचा तपास आणि चोरट्यांचा शोध घेण्यासाठी टीम तयार केली होती. या टीमने सुरुवातीला टेम्पो मालक पांडुरंग महाडीकला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे टेम्पोचालक संतोष बबन दिघेला ताब्यात घेण्यात आले. संतोष दिघेने प्रेमकुमार चौहान, अनिल व मोहन मिश्रा या साथीदारांच्या मदतीने रेल्वे केबिनमधून रेल्वे केबलची चोरी केल्याचा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांनी महाडिक, दिघे, चौहान यांना अटक केली असून अनिल व मोहन मिश्राचा शोध घेतला जात आहे.