अ‍ॅपशहर

चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडले; चोरांनी ७८ बॉक्स पळवले

नाशिकमधील पंचशिलनगरमध्ये चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडले. दुकानातील देशी दारूचे ७८ बॉक्स पळवले. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 21 Apr 2021, 2:20 pm
नाशिक : संचारबदी नियम लागू झाल्यानंतर मद्यविक्री बंद असून, ही संधी साधत चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडून देशी दारूचे ७८ बॉक्स दारू चोरून नेले. ही घटना पंचशिलनगर भागात घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम चोरट्यांनी देशी दारूचे दुकान फोडले; ७८ बॉक्स पळवले


या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. विजय गंगाराम विधाते (रा. टाकळीरोड, द्वारका) यांनी तक्रार दिली. विधाते यांचे खडकाळी सिग्नल भागात देशी दारू विक्रीचे दुकान आहे. संचारबंदीमुळे दुकान बंद असल्याने ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दोन ते १८ एप्रिल दरम्यान बंद दुकानाच्या पाठीमागील शटरची कुलपे तोडून देशी दारूचे तब्बल ७८ खोकी चोरून नेली. त्यात सुमारे एक लाख ८३ हजार ३०० रुपये किंमतीची दारू होती.

नांदेड: उपजिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डात डॉक्टरवर चाकूहल्ला

अपघातात पादचारी ठार

नाशिक : भरधाव अज्ञात चारचाकीच्या धडकेत ५५ वर्षीय पादचारी ठार झाला. मृत पादचारीची अद्याप ओळख पटली नसून, या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी (दि.१७) रात्री आडगाव शिवारातील स्टार मोटार गॅरेज समोर हा अपघात घडला.

पुणे: माजी खासदार संजय काकडे यांना अटक; काय आहे प्रकरण?

वृद्धाचा मृत्यू

नाशिक : गच्चीवरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ७६ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना देवळीली कॅम्प भागात घडली. रमेश रामचंद्र कटारे (रा. देवळाली कॅम्प) असे त्यांचे नाव आहे. कटारे गेल्या बुधवारी (दि. १४) आपल्या राहत्या घराच्या गच्चीवर झोपलेले होते. अचानक ते जमिनीवर कोसळले होते. वाडिवऱ्हे पोलिसांनी या मृत्यूची नोंद देवळाली कॅम्प पोलिसांकडे वर्ग केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज