अ‍ॅपशहर

Fake TRP Scam: 'BARC'च्या माजी अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक

टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच बार्कशी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. बार्कचे माजी अधिकारी रोमिल रामगढिया यांनी पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ही या प्रकरणातील १४ वी अटक आहे.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Dec 2020, 4:40 pm
मुंबई: टीआरपी घोटाळ्यात मुंबई पोलिसांकडून अटकसत्र सुरूच असून, बार्कच्या (BARC) माजी अधिकाऱ्याला आज, गुरुवारी विशेष पथकाने अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अटकेतील आरोपींची संख्या १४ वर पोहोचली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम BARCच्या माजी अधिकाऱ्याला मुंबई पोलिसांनी केली अटक


टीआरपी घोटाळा प्रकरणात रविवारपासून अटकेत असलेले रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना एस्प्लानेड मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने काल, बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. त्यानंतर आज, या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (BARC)चे माजी मुख्य ऑपरेशन ऑफिसर (सीओओ) रोमिल रामगढिया (Romil Ramgarhia ) यांना अटक केली. बार्क संस्थेशी संबंधित ही पहिलीच अटक असून, आतापर्यंत या प्रकरणात १४ जणांना अटक केली आहे.

कोण आहेत रोमिल रामगढिया?

टीव्ही वाहिन्यांची प्रेक्षकसंख्या मोजणारी संस्था बार्क संस्थेचे भारतातील चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमिल रामगढिया यांनी काही महिन्यांपूर्वीच पदाचा राजीनामा दिला होता. ते सहा वर्ष या संस्थेत कार्यरत होते. सन २०१४ मध्ये बार्क इंडियामध्ये चीफ बिझनेस ऑफिसर म्हणून ते रुजू झाले होते. रामगढिया यांना मीडिया, टेलिकॉम आणि मॅन्युफॅक्टरिंग सेक्टरमध्ये काम करण्याचा १८ हून अधिक वर्षांचा अनुभव आहे.

Arnab Goswami : अर्णब गोस्वामींनी अटकपूर्व जामीन अर्ज घेतला मागे; काय आहे 'ते' प्रकरण? वर्ध्यात दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, ३ लाखांची रोकड, साडेतीन किलो सोने लुटले टीआरपी घोटाळा : 'रिपब्लिक'च्या सीईओंना सशर्त जामीन

महत्वाचे लेख