बहराइच: उत्तर प्रदेशातील बहराइच येथे एका १३ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली. १२ तासांनी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मृत मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता. मुलगी घरी एकटी होती. त्याने तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ११ एप्रिल रोजी एका मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. मुलगी आपल्या वडिलांच्या दुकानातून घरी आली होती. तिचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिची हत्या केली. मृतदेह तलावाच्या काठावर फेकला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात खळबळ माजली. जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनेचा आढावा घेतला. या घटनेत सामील असलेल्या आरोपींचा अटक करण्याचे आदेश त्यांनी दिले होते.
कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात बलात्कार, पॉक्सो अॅक्ट, हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांची पथके नेमून गुन्ह्याचा तपास आणि आरोपींचा शोध घेण्यात येत होता. पोलिसांनी १२ तासांतच या गुन्ह्याचा उलगडा केला. आरोपीला अटक केली. आरोपी हा मृत मुलीच्या घरीच ड्रायव्हरचे काम करत होता. त्याने हत्येची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. बहराइचच्या पोलीस अधीक्षक सुजाता सिंह यांनी सांगितले की, एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह तलावाच्या काठावर सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. संशय आणि पुराव्यांच्या आधारे फूलचंद नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.