अ‍ॅपशहर

प्रेमाच्या जाळ्यात मुलीला ओढून केले ब्लॅकमेल; बॉयफ्रेंडसह मित्रांनी केला बलात्कार

उत्तर प्रदेशातील गुन्ह्याच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. बुलंदशहरमध्ये एका मुलीवर तिच्या प्रियकरासह त्याच्या मित्रांनी बलात्कार केला. तिचे आक्षेपार्ह फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Nov 2020, 5:51 pm
बुलंदशहर: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर बलात्काराच्या घटनेने हादरले. जिल्ह्यातील आहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मुलीवर बलात्कार करण्यात आला. तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून प्रियकराने तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्रांना पाठवले. त्यानंतर तिला ब्लॅकमेल करून प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी बलात्कार केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रेमाच्या जाळ्यात मुलीला ओढले, बॉयफ्रेंडसह मित्रांनी केला बलात्कार


बलात्कारानंतर मुलीचा व्हिडिओ काढण्यात आला. तसेच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तरुणांच्या त्रासाला कंटाळून मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी तरूण गावातीलच आहे. त्याने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. ते फोटो आपल्या मित्रांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केले. त्यानंतर प्रियकर आणि त्याच्या मित्रांनी तिला ब्लॅकमेल करून धमकावले. तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलीने ओढवलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तात्काळ आहार पोलीस ठाण्यात तिघांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीची वैद्यकीय चाचणी करण्यात येणार आहे. तसेच तिचा जबाब नोंदवून घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

एकाच कुटुंबातील ६ जण कुलूपबंद घरात मृतावस्थेत आढळले; आत्महत्या की हत्या?

पुणे: सकाळी मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले होते, आत पाहिलं तर...

पत्नीच्या मृत्यूला जबाबदार; पतीसह सासूचा जामीन कोर्टाने फेटाळला

Mumbai: अनैतिक संबंध ठेवण्यास नकार, 'तिने' रचला प्रियकराच्या हत्येचा कट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज