अ‍ॅपशहर

१२ वर्षीय मुलाचं अपहरण; जंगलात नेऊन ३ दिवस केले अनैसर्गिक अत्याचार

१२ वर्षीय मुलाचं अपहरण करून जंगलात नेऊन त्याच्यावर सलग तीन दिवस अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेजारी राहणाऱ्या तरुणानेच मुलाचं अपहरण केले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Aug 2020, 2:13 pm
मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये एका १२ वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलाने आपबीती सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून दोन आरोपींना अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम १२ वर्षीय मुलाचं अपहरण; जंगलात नेऊन ३ दिवस केले अनैसर्गिक अत्याचार


मेरठमध्ये ही संतापजनक घटना घडली आहे. १२ वर्षांच्या मुलाला शेजारच्या तरुणाने खाऊचे आमिष दाखवून नेले. त्यानंतर अन्य एका साथीदाराच्या मदतीने त्याला जंगलात नेले. तीन दिवस त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले. गुरुवारी रात्री तो गंभीर अवस्थेत आढळून आला. त्याने पोलिसांना सर्व हकिकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

रिझानी गावातील एक व्यक्ती मजुरी करते. त्याच्या शेजारीच रामतीर्थ नावाचा तरुण राहतो. रामतीर्थ याने त्याच्या १२ वर्षीय मुलाला विडी ओढण्याची सवय लावली. याबाबत त्याच्या वडिलांना समजले. तो मुलावर रागावला. मात्र, त्याची सवय गेली नाही. २४ ऑगस्ट रोजी हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. दोन दिवस या मुलाचा शोध घेतला जात होता. मात्र, तो सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी परतापूर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तर शेजारी राहणाऱ्या रामतीर्थवर मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला.

पतीच्या पासपोर्टवर बॉयफ्रेंडला ऑस्ट्रेलियाला घेऊन गेली, पण...

बॉयफ्रेंडविरोधात बलात्काराची खोटी तक्रार; तरुणीला दिली 'ही' शिक्षा

जेवताना पाणी दिलं नाही; पतीने केलेल्या मारहाणीत गर्भवती पत्नीचा मृत्यू

संतापजनक! गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी कुटुंबीयांची तक्रार नोंदवून घेतली. त्यानंतर संशयित आरोपी रामतीर्थला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली. मात्र, त्याने काहीच सांगितलं नाही. गुरुवारी रात्री या मुलाच्या शेजारी राहणारी व्यक्ती गावाजवळून जात असताना, त्याला रस्त्याच्या कडेला गंभीर अवस्थेत मुलगा दिसून आला. याबाबत पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस या मुलाला घेऊन पोलीस ठाण्यात गेले. या मुलाने आपबीती सांगितली. शेजारी राहणाऱ्या रामतीर्थने सोबत नेले. त्याच्या एका साथीदाराने जंगलात नेले. तीन दिवस माझ्यावर अत्याचार केले. विरोध केला असता मला बेदम मारहाण करत असत, असे त्याने सांगितले. कशीबशी त्यांच्या तावडीतून सुटका करून पळालो. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून रामतीर्थच्या साथीदारालाही अटक केली. दोघांच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

'त्या' निर्दयी महिलेची जन्मठेप कायम, पण ११ वर्षांपासून आहे फरार

महिलेवर मित्रासह तिघांनी केला सामूहिक बलात्कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज