अ‍ॅपशहर

संतापजनक! गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याच्या बहाण्याने गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मिर्झापूर येथे ही मुलगी राहत असून, तिला गावातील महिला वाराणसीला घेऊन गेली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2020, 1:43 pm
मिर्झापूर: उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर वाराणसीतील ब्युटी पार्लरमध्ये कथितरित्या गुंगीचे औषध देऊन सामूहिक बलात्कार केल्याचा आणि तिला वेश्याव्यवसायात ढकलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनं कशीबशी तेथून सुटका करून घेतली. त्यानंतर पोलिसांना आपबीती सांगितली. वाराणसी पोलिसांनी मिर्झापूर पोलिसांशी संपर्क केला असता, मुलगी बेपत्ता झाली असून, कुटुंबीय तिचा शोध घेत असल्याचे समजले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम संतापजनक!  गुंगीचं औषध देऊन अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार


पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीचं वय १५ वर्षे आहे. मिर्झापूरच्या चुनार तालुक्यातील एका गावातील ती रहिवासी आहे. गावातील एका महिलेने तिला वाराणसीच्या रामनगरमध्ये ब्युटी पार्लरमध्ये नोकरी देण्याची बतावणी करून नेले होते. काही दिवस सगळं काही ठीक चाललं होतं. मात्र, त्यानंतर थोड्या दिवसांनी ब्युटी पार्लरमध्ये गुंगीचे औषध देऊन वेश्याव्यवसायात ढकलले. तिथे तिच्यावर दररोज बलात्कार केला जात होता. मुलीने त्यांच्या तावडीतून स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. त्यानंतर वाराणसी पोलिसांत जाऊन घडलेली घटना सांगितली.

गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; पतीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या

'त्या' निर्दयी महिलेची जन्मठेप कायम, पण ११ वर्षांपासून आहे फरार

महिलेवर मित्रासह तिघांनी केला सामूहिक बलात्कार

ऑनलाइन सेक्सनंतर स्वतःचाच व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर आला अन्...


वाराणसी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी तात्काळ चुनार पोलिसांशी संपर्क साधला. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली असल्याची माहिती त्यांनी वाराणसी पोलिसांना दिली. मुलीच्या काकाच्या मुलाने १५ ऑगस्ट रोजी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मुलीने आरोपींविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी ठिकठिकाणी छापेमारी केली जात आहे.

विदेशी महिलेने लक्ष्मण झुल्यावर शूट केला न्यूड व्हिडिओ

खळबळ! रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याच्या घरात घुसून पत्नी-मुलाची केली हत्या

एकतर्फी प्रेमाची 'नशा'; तरुणीने वेळीच पोलिसांत धाव घेतली, अन्यथा...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज