अ‍ॅपशहर

धक्कादायक! पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापले; शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार

शेजाऱ्यांनी पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याची तक्रार मालकाने केली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील रसुलाबाद पोलिसांत ही तक्रार देण्यात आली असून, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Apr 2021, 7:35 pm

हायलाइट्स:

  • पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना
  • उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रसुलाबाद परिसरातील प्रकार
  • मालकाची शेजाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापले; मालकाची शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार
कानपूर: उत्तर प्रदेशातील कानपूरच्या सुजानपूर परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप मालकाने शेजाऱ्यांवर केला आहे. सोमवारी हा प्रकार उघडकीस आला. जखमी कुत्र्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्याची प्रकृती सुधारत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रसुलाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजानपूर परिसरात ही घटना घडली. सुजानपूरमधील कुत्र्याचे मालक सुरेश सिंह यांनी शेजाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेजाऱ्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याचे गुप्तांग कापल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कुत्र्याच्या विव्हळण्याचा आवाज आल्यानंतर तिथे लगेच पोहोचलो. जखमी अवस्थेत कुत्रा पडला होता. त्याला तात्काळ पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, असे सुरेश सिंह यांनी सांगितले.

बेपत्ता मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी मागितले १ लाख, वडिलांनी घेतला गळफास

रसुलाबाद पोलिसांनी सांगितले की, सुरेश सिंह यांच्याकडून तक्रार प्राप्त झाली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर लगेच वरिष्ठ पोलिसांना लगेच घटनास्थळी आणि पशुवैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेची माहिती घेण्यात आली. तक्रारदाराने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असले आणि यात खरेच कुणी दोषी असले तर, त्यांच्याविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती रसुलाबाद पोलिसांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज