अ‍ॅपशहर

भरवर्गात शिक्षक विद्यार्थ्यावर रागावले; कॉलेजबाहेरच दुचाकी अडवून गोळ्या घातल्या

वर्गात इतर विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याने शिक्षक रागावले होते. इतकाच काय तो त्यांचा दोष होता. पण वर्गात सगळ्यांसमोर रागावणे विद्यार्थ्याला रुचले नाही. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ही धक्कादायक घटना घडली.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2021, 11:57 am

हायलाइट्स:

  • वर्गात रागावले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडल्या गोळ्या
  • उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये धक्कादायक घटना
  • तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम भरवर्गात शिक्षक विद्यार्थ्यावर रागावले; कॉलेजबाहेरच दुचाकी अडवून गोळ्या घातल्या
गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एका खासगी कॉलेजात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकावर गोळ्या झाडून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. दुसऱ्या विद्यार्थ्याला त्रास देत असल्यावरून ते त्याला वर्गात रागावले होते. पोलिसांनी आरोपी विद्यार्थी आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शिक्षक सचिन त्यागी मुरादनगर येथे कृष्णा विद्या निकेतनच्या मेन गेटबाहेर निघाले. त्याचवेळी आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर हल्ला केला. गेटच्या बाहेर थोड्या अंतरावर आरोपींनी त्यांची दुचाकी अडवली आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

मित्रांकडून अलीशान कार मागायचे, प्रवाशांना द्यायचे लिफ्ट, नंतर...

ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. फुटेजमध्ये आरोपी गोळीबार करताना दिसत आहेत. शिक्षक या हल्ल्यातून बचावले आहेत. पोलिसांनी सांगितले की, शिक्षकांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. वर्गात दुसऱ्या विद्यार्थ्यांना त्रास देत होता. यावरून ते संबंधित विद्यार्थ्याला रागावले होते. यावरून त्याने हे कृत्य केले. शिक्षकांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. तीन आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींची दुचाकी जप्त केली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज