अ‍ॅपशहर

गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; पतीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या

पतीला गुटखा खाण्यापासून रोखलं म्हणून रागाने त्याने पत्नीवर पिस्तुलातून गोळ्या झाडल्या. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2020, 12:33 pm
मेरठ: उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील हस्तिनापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना घडली आहे. लग्नाच्या सहा महिन्यांनंतर एका तरुणाने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडल्या. तिनं पतीला गुटखा खाण्यापासून रोखलं. पत्नीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, तिची प्रकृती गंभीर आहे. महिलेच्या वडिलांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम गुटखा खाताना पत्नीनं हटकलं; पतीनं तिच्यावर गोळ्या झाडल्या


हस्तिनापूरच्या लालसिंह नगरमध्ये राहणाऱ्या रणवीर सिंह यांची मुलगी काजलचं लग्न सहा महिन्यांपूर्वी गणेशपूर गावातील नेत्रपाल यांचा मुलगा लोकेश याच्यासोबत झालं होतं. लोकेशला दारू आणि गुटख्याचं व्यसन होतं. तर काजल त्याच्या व्यसनांना वैतागली होती. लग्नानंतर तिला लोकेशच्या गुटख्याच्या व्यसनाबाबत माहिती झालं. ती त्याला गुटखा खाण्यापासून रोखायला लागली. यावरून सुरुवातीला त्यांच्यात खटके उडत होते. मात्रस त्यानंतर गुटखा खाण्यावरून या दाम्पत्यामध्ये दररोज भांडण होत असे.

'त्या' निर्दयी महिलेची जन्मठेप कायम, पण ११ वर्षांपासून आहे फरार महिलेवर मित्रासह तिघांनी केला सामूहिक बलात्कारऑनलाइन सेक्सनंतर स्वतःचाच व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर आला अन्...
लोकेश शुक्रवारी दुपारी गुटखा खाऊन घरी आला. त्याला पाहून पत्नी काजलला राग आला. काजलने त्याला हटकले. त्यामुळे रागाने त्याने पिस्तुलातून पत्नी काजलवर गोळ्या झाडल्या. यामुळे खळबळ माजली. कुटुंबीयांनी काजलला जखमी अवस्थेत तात्काळ रुग्णालयात नेले. तिथे संध्याकाळी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. काजलच्या वडिलांनी लोकेशविरोधात तक्रार दाखल केली आहे. आरोपी लोकेशला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती हस्तिनापूर पोलीस ठाण्याचे प्रमुख धर्मेंद्र सिंह यांनी दिली.

विदेशी महिलेने लक्ष्मण झुल्यावर शूट केला न्यूड व्हिडिओखळबळ! रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्याच्या घरात घुसून पत्नी-मुलाची केली हत्या एकतर्फी प्रेमाची 'नशा'; तरुणीने वेळीच पोलिसांत धाव घेतली, अन्यथा...संतापजनक! धावत्या डबल डेकर बसमध्ये महिलेवर बलात्कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज