अ‍ॅपशहर

मिस्ड कॉलने घेतला जिवलग मित्राचा जीव; 'असं' काय घडलं?

फोनवर मिस्ड कॉल देऊन प्रँक करणे एका मित्राला चांगलंच महागात पडलं आहे. यावरून दोघांमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर खड्ड्यात पडून मित्राचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी २१ वर्षीय तरुणावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2020, 3:21 pm
वडोदरा: गुजरातमधील कर्जनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रँक आणि मिस्ड कॉलमुळे एका मित्राला जीव गमवावा लागला आहे. मिस्ड कॉलवरून झालेल्या धक्काबुकीत खड्ड्यात पडल्याने ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कॉलने घेतला जिवलग मित्राचा जीव; असं काय घडलं?


मित्राला मिस्ड कॉल करत असल्यानं दोघांमध्ये वाद झाला. फोनवरून बाचाबाची झाल्यानंतर प्रत्यक्ष समोरासमोर आले. दोघांमध्ये धक्काबुक्की झाली आणि फोन करणाऱ्या तरुणाने मित्राला ढकलून दिलं. तो एका खड्ड्यात जाऊन पडला. यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय जयेश पटनवाडिया हा तरूण ओसलाम गावात राहतो. त्याने नवीन मोबाइल फोन घेतला होता. त्यावरून तो मित्र सतीश पटनवाडिया याला मिस्ड कॉल करत होता. त्यामुळे सतीश वैतागला. सतीश आणि जयेश यांच्यात फोनवरून वाद झाला. सतीश मोबाइलवर गेम खेळत असताना, जयेश त्याला मिस्ड कॉल्ड देऊन त्रास देत होता. त्यामुळे दोघांमध्ये बाचाबाची झाली. अखेर दोघांनी गावाजवळच्या बसथांब्यावर भेटून सोक्षमोक्ष लावायचे ठरवले. त्यानुसार ११ ऑगस्टला संध्याकाळी दोघेही बसथांब्यावर भेटले.

डिलिव्हरी बॉय पाठवायचा अश्लील व्हिडिओ, 'तिनं' घरी बोलावलं अन्..

समलिंगी पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून नाल्यात फेकले

पुणे: भाजप नगरसेविकेच्या पतीला खंडणीसाठी धमकी


दोघेही भेटल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची झाली. सतीशने जयेशला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. शिवीगाळ करू नको असे जयेशने त्याला सांगितले. मात्र, संतापलेला सतीश रागाने बोलत होता. शेवटी दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. जयेशने सतीशला धक्का दिला. त्यावेळी त्याचा तोल गेला आणि तो सात फूट खोल खड्ड्यात जाऊन पडला. यात तो गंभीर जखमी झाला. सतीशचा चुलत भाऊ जिग्नेश हा तिथे होता. जयेश मात्र, घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी झाल्याने सतीशचा मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, सतीशची हत्या करण्याचा जयेशचा हेतू नव्हता. मात्र, त्याच्यामुळे सतीशचा जीव गेला. यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीने चहा करायला दिला नकार, पतीनं केलं भयानक कृत्य

सांगली: भूसंपादनावेळी राडा; शेतकऱ्याने कर्मचाऱ्याचे डोके फोडले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज