अ‍ॅपशहर

Vikas Dubey encounter: पोलिसांकडून लुटलेली AK-47 विकास दुबेच्या घरात

पोलीस चकमकीत मारला गेलेला कुख्यात गँगस्टर विकास दुबे याच्या घरी पोलिसांनी छापेमारी केली. त्याच्या घरातून इन्सास रायफल आणि एके ४७ जप्त करण्यात आली आहे.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2020, 12:25 pm
कानपूर: कानपूरच्या बिकरू गावात झालेल्या पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी गँगस्टर विकास दुबे याला पोलिसांनी चकमकीत ठार केलं. त्यानंतर आता पोलिसांनी विकास दुबे याच्या घरावर छापेमारी केली. त्याच्या घरात एक एके-४७ रायफल आणि एक इन्सास रायफल जप्त केली आहे. हत्याकांडात सामील असलेल्या आणखी एका आरोपीच्या अटकेनंतर ही छापेमारी केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम विकास दुबे


याबाबत अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) प्रशांत कुमार यांनी मंगळवारी कानपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. पोलिसांनी कानपूर हत्याकांड प्रकरणात आणखी एक आरोपी शशिकांत उर्फ सोनू याला अटक केली आहे. त्याच्यावर ५० हजार रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती त्यांनी दिली.

पुणे: मुलीवर होतं प्रेम; बापाच्या सांगण्यावरून तरुणाला घातल्या गोळ्या

औरंगाबाद: निवृत्त एसटी ड्रायव्हरचा खून; शीर झाल्टा फाटा, धड साताऱ्यात फेकलं


चौबेपूर येथून आरोपीला केली अटक

शशिकांत हा देखील बिकरू गावातील आहे. त्याला पोलिसांनी चौबेपूर येथून अटक केली. घटनेच्या दिवशी तो विकास दुबेसोबत त्याच्या घरीच होता, अशी कबुली त्याने दिली आहे. चौकशीदरम्यान त्याने अनेक आरोपींची नावे सांगितली आहेत. ते देखील या हत्याकांडात सामील होते, अशी माहितीही कुमार यांनी दिली.

पोलीस हत्याकांडावेळी कोण- कोण होतं?

आरोपी शशिकांत यानं पोलीस चौकशीत कबुली दिली आहे. पोलिसांवरील हल्ल्यात प्रेम कुमार, प्रभात मिश्रा, शिवम, जिलेदार, रामसिंह, रमेश चंद, अखिलेश मिश्रा, विपुल, श्यामू बाजपेयी, राजेंद्र मिश्र, दयाशंकर अग्निहोत्री आदी सामील होते, असं त्यानं पोलिसांना सांगितलं.

दबंगगिरी, गँगस्टर आणि अंत...कुख्यात गुंड विकास दुबेची कुंडली

Vikas Dubey Encounter: गँगस्टर विकास दुबेसह 'त्या' सर्व गुंडांचा असा केला एन्काउंटर


विकास दुबेच्या घरावर छापा

हत्यारे आणि शस्त्रसाठा विकास दुबेच्या घरीच लपवून ठेवल्याची माहिती आरोपी शशिकांत यानं दिली. त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बिकरू गावातील विकास दुबेच्या घरावर छापेमारी केली. त्यावेळी एक एके ४७ रायफल, इन्सास रायफल, १७ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

आतापर्यंत इतक्या जणांवर झाली कारवाई

प्रशांत कुमार यांनी सांगितलं की, या प्रकरणात आतापर्यंत एकूण २१ आरोपींची नावे समोर आली होती. श्यामू वाजपेयी, श्याम यादव, दयाशंकर आणि शशिकांत यांना अटक झाली आहे. तर विकास दुबे, राजाराम, अतुल दुबे, अमर दुबे, प्रवीण दुबे आणि प्रभात मिश्रा चकमकीत मारले गेले आहेत. सात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर ११ आरोपी अजून फरार आहेत. दोन जणांना महाराष्ट्रातील ठाण्यात अटक करण्यात आली आहे. त्यांना उत्तर प्रदेशात आणलं जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज