अ‍ॅपशहर

VIDEO: मॅडम थांबा! सँडल दाखवा! संशय आल्यानं कस्टम विभागानं सँडल काढायला लावली अन् मग...

Woman Carrying Cocaine Arrested: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. एका महिला प्रवाशाला विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या महिलेकडे ४९० ग्रॅम कोकेन सापडलं. बाजारात त्याची किंमत ४.९ कोटी रुपये आहे. ही घटना गुरुवारी घडली. घटनेची माहिती आता कस्टम विभागाकडून देण्यात आली आहे.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 10:41 am
मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं मोठी कारवाई केली आहे. एका महिला प्रवाशाला विमानतळावर अटक करण्यात आली आहे. या महिलेकडे ४९० ग्रॅम कोकेन सापडलं. बाजारात त्याची किंमत ४.९ कोटी रुपये आहे. ही घटना गुरुवारी घडली. घटनेची माहिती आता कस्टम विभागाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mumbai airport sandal


बिबट्याच्या कातडीच्या रंगाची सँडल परिधान करून महिला निघाली होती. तिची सँडल पाहून कस्टमच्या अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी तिला सँडल काढण्यास सांगितली. यानंतर अधिकाऱ्यांकडून तिच्या सँडलची तपासणी करण्यात आली. या सँडलमध्ये एक विशेष पोकळी तयार करण्यात आली होती. त्यात अधिकाऱ्यांना कोकेन सापडलं. कस्टम विभागानं ट्विट करून याबद्दलची माहिती आणि व्हिडीओ शेअर केला.

अटक करण्यात आलेल्या महिलेबद्दलचा अधिक तपशील कस्टमकडून देण्यात आलेला नाही. ही महिला नेमकी कुठे जात होती, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कस्टम विभागानं महिलेच्या सँडलचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यात कस्टमचा अधिकारी सँडल उघडताना दिसत आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर अधिकाऱ्याला सँडल उघडण्यात यश आलं. त्यात काळ्या रंगाच्या टेपमध्ये गुंडाळलेलं कोकेन सापडलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख