अ‍ॅपशहर

पोलिसाचा खबरी असल्याची बतावणी; तरुणावर प्राणघातक हल्ला

पोलिसांचा खबरी असल्याचं म्हणत चार ते पाच जणांच्या टोळक्याने तरुणावर प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलीस कोठडी सुनावली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Sep 2020, 11:53 am
म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद: पोलिसांचा खबऱ्या असल्याची बतावणी करून चार ते पाच जणांनी एकावर लोखंडी रॉड व लाकडी दांड्याने प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास गोलवाडी शिवाराजवळील हॉटेल माउली समोर घडली. या प्रकरणात सातारा पोलिसांनी देवीलाल लक्ष्मण मुंगसे (वय ४३, रा. गोलवाडी) व अनिल नंदलाल सूर्यवंशी (वय ३४, रा. तीसगाव) या दोघांना बुधवारी पहाटे अटक केली. त्यांना चार सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पोलिसाचा खबरी असल्याची बतावणी; तरुणावर प्राणघातक हल्ला


सातारा परिसरातील रहिवासी विलास अशोक मोरे याने तक्रार दिली. त्याची प्रकृती ठीक नव्हती, शिवाय औषधासाठी पैसे नसल्याने त्याने मित्र आमेर काझी याला फोन करून औषधीसाठी पैसे मागितले. आमेरने त्याला हॉटेल माउली येथे बोलाविले होते. त्यानुसार रात्री साडेनऊ वाजता विलास दुचाकीवरून तेथे गेला असता तेथे उभा असलेला देवीलाल मुंगसे याने हा तर पोलिसांचा खबरी म्हणत विलासला शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी पप्पु मुंगसे, लालचंद चौधरी व अनिल सूर्यवंशी या तिघांनी विलासला लाकडी दांड्याने व चापटाने मारहाण केली. देवीलाल याने लोखंडी रॉडने कपाळावर वार करुन गंभीर जखमी केले. दोघांना अटकेनंतर न्यायालयात हजर करण्यात आले. गुन्ह्यात वापरलेला लोखंडी रॉड जप्त करणे बाकी आहे, तसेच आरोपींच्या इतर साथीदारांना अटक करायची असल्याने पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील एन. ए. ताडेवार यांनी केली. ही विनंती मान्य करून न्यायालयाने कोठडीचे आदेश दिले.

आणखी बातम्या वाचा:

भरदिवसा थरार! ATMमध्ये पैसे भरण्यासाठी निघाले होते, अचानक...

खळबळजनक! ३ सूनांनी केली सासूची हत्या; फासावर लटकावलं

विधवेवर बलात्कार केल्यानंतर काढले अश्लील फोटो, लग्नासाठी दबाव

माहेरी आलेल्या नवविवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार

डान्सरला बर्थडे पार्टीसाठी बोलावलं, हॉटेलमध्ये केला बलात्कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज