अ‍ॅपशहर

कृष्णा, ओ काले कृष्णा

गोरा रंग सर्वांनाच हवाहवासा वाटतो. बऱ्याच वेळा गोरा रंग हाच व्यक्तीच्या सौदर्यांचा चुकीचा मापदंड ठरवला जातो. मनाच्या आंतरिक सौदर्याकडे कुणाचं फारसं लक्ष जात नाही

Maharashtra Times 13 Jun 2018, 6:53 am
अनिल गायकवाड
महाराष्ट्र टाइम्स.कॉम artical on differentiation
कृष्णा, ओ काले कृष्णा


गोरा रंग सर्वांनाच हवाहवासा वाटतो. बऱ्याच वेळा गोरा रंग हाच व्यक्तीच्या सौदर्यांचा चुकीचा मापदंड ठरवला जातो. मनाच्या आंतरिक सौदर्याकडे कुणाचं फारसं लक्ष जात नाही; कारण ती एक अमूर्त कल्पना आहे. हे लिहायचं कारण म्हणजे १९६४च्या सुमारास आलेला ए. व्ही. एम. भद्रासचा 'मैं भी लडकी हूं' हा सिनेमा काळ्या रंगाच्या समस्येवर आधारित होता. सिनेमाची नायिका रजनी निरक्षर आणि काळ्या वर्णाची असते. नायकाच्या झालेल्या फसवणुकीमुळे तिचा विवाह धर्मेन्द्र या गोऱ्या, देखण्या आणि सुशिक्षित तरुणाशी होतो. सिनेमाचा नायक मनाच्या सुंदरतेला महत्त्व देणारा असतो, त्यामुळे तो काळ्या रजनीचा स्वीकार करतो. सिनेमा सुखांत आहे; पण पण तिथपर्यंतचा प्रवास करताना रजनीला अनेक दिव्यातून जावं लागतं.

विवाहानंतर रजनीच्या सासरच्या स्त्रिया तिचा पदोपदी अपमान करतात. निरक्षरता आणि रंगरूपावरून टोमणे मारतात. तिची जीवघेणी अवहेलनाही केली जाते. रजनी हे सर्व सोशिकपणे सहन करते; पण एके दिवशी या अन्यायाची परिसीमा होते. अनेकांच्या वाग्बाणांनी घायाळ झालेली रजनी श्रीकृष्णाच्या मूर्तीपुढे धावत जाऊन नतमस्तक होते आणि त्याला जाब विचारून आपली व्यथा पुढील गीतामधून मांडते.

कृष्णा, ओ काले कृष्णा

तू ने ये क्या किया?

कैसा बदला लिया

रंग दे के मुझे अपना

हे काळ्या कृष्णा, तू हे काय केलं? तुझा काळा रंग मला देऊन तू कसला बदला घेतलास?

पूजे सभी काले भगवान को

और ठुकराये सब काले इन्सान को

बन्सी की धून में मगन तू रहे

तुझ को क्या जुल्म लाखो जो कोई सहे

काळ्या ईश्वराची तर सर्व पूजा करतात; पण काळ्या व्यक्तीला लाथडतात. तू तर बासरीच्या सुस्वरांमध्ये मग्न असतो. कुणावर लाखो जुलुम होतात, त्याचं तुला काय?

सुरत तो काली छुपा ना सकू

कितना उजला है दिल ये दिखा ना सकू

दिल मुझको अच्छा दिया था अगर

क्यो न दी तुने दुनिया को अच्छी नजर?

माझा काळा चेहरा मी लपवू शकत नाही; पण माझं मन किती उजळ आहे हे दाखवू शकत नाही. तू मला इतकं चांगलं मन दिलं आहेस, तर त्याला पारखणारी चांगली दृष्टी जगाला का दिली नाहीस? आपल्या हृदयस्पर्शी आणि जिवंत अभिनयानं शोकांतिका सम्राज्ञी मीनाकुमारी यांनी रजनीची व्यथा बोलकी केली आहे. राग, दु:ख आणि अनतिकता यांचं दर्शन त्यांनी या गाण्यातन दाखवलंय. लताजींनी आपल्या स्वरातून रजनीचं दु:ख गहिरं केलंय. दोन्ही अंतऱ्यानंतर त्यांनी दिलेला हुंदका श्रोत्यांच्या डोळ्यांतही अश्रू उभे करतो. प्रत्यक्ष परमेश्वरासमोर कैफीयत मांडणारे राजेंद्र कृष्ण यांचं शब्द अप्रतिमच. या सर्वांबरोबरच चित्रगुप्त यांच्या संगीतानं या गाण्याची आर्तता शतपटीनं वाढवली आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज