अ‍ॅपशहर

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं. म्हणजे नेमकं काय घडलं. सर्जिकल स्ट्राइक्स ही काही साधी, सोपी गोष्ट नाही. हा हल्ला शत्रूच्या क्षेत्रात घुसून केला जातो. म्हणूनच यात नुकसान होण्याची भीती अधिक असते. त्यासाठी खूप मोठी तयारी आणि अचूक नियोजनाची गरज असते आणि लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅराकमांडोज् ही कामगिरी पार पाडतात.

Maharashtra Times 29 Sep 2016, 3:28 pm
prasad.panse@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम what is surgical strikes
सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?


भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं. म्हणजे नेमकं काय घडलं. सर्जिकल स्ट्राइक्स ही काही साधी, सोपी गोष्ट नाही. हा हल्ला शत्रूच्या क्षेत्रात घुसून केला जातो. म्हणूनच यात नुकसान होण्याची भीती अधिक असते. त्यासाठी खूप मोठी तयारी आणि अचूक नियोजनाची गरज असते आणि लष्कराच्या स्पेशल फोर्सचे पॅराकमांडोज् ही कामगिरी पार पाडतात. त्यांचं काम आणि प्रशिक्षण हे केवळ अशा कारवायांसाठीच असते. अर्थात हे प्रशिक्षण अत्यंत खडतर असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने (मिलिटरी इंटेलिजन्स) युद्धविरामाच्या म्हणजेच शांतता काळात आपल्या खास पद्धतीने मिळवलेली माहिती हाच या हल्ल्याचा पाया असतो. या माहितीच्या आधारावर या कारवाईचा संपूर्ण आराखडा तयार केला जातो. एखादे ऑपरेशन म्हणजेच 'सर्जरी'. ज्या प्रकारे संपूर्ण शरीरावर न करता एखाद्या विशिष्ट भागावरच केली जाते, त्या प्रमाणेच ही सर्जिकल स्ट्राइकही अचूकरित्या विशिष्ट भागावरच करण्यात येते. हल्ल्याचे नियोजन करतानाच त्याच्या सर्व संभाव्य परिणामांचा विचार केला जातो आणि रात्रीच्या वेळीच ही कारवाई केली जाते. प्रत्येक गोष्टीसाठी वेळ ठरलेली असते आणि घड्याळ्याच्या काट्यावरच ही कामगिरी पार पडते. बऱ्याचदा सीमेलगतच्या भागात विमान अथवा हेलिकॉप्टरमधून या जवानांना पॅराशूटच्या साह्याने शत्रूच्या भागात उतरवले जाते. म्यानमारमध्ये घुसून भारतीय लष्कराने अशीच कामगिरी केली होती. म्यानमारमध्ये घुसून भारतीय पॅरा कमांडो अवघ्या एका तासात ४० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करून यशस्वीरित्या परत आले होते. त्याच धर्तीवर हे ऑपरेशनही पार पडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज