अ‍ॅपशहर

महिलांमधील सांध्यांचे आजार

हल्लीच्या काळात सर्वच वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये हाडांचे विकार वाढत आहेत. खास करुन ऑस्ट‌िओपोरोसीस (सांध्याची झीज)समस्या वाढत आहेत. हा आजार टाळण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आपण ऑस्ट‌िओपोरोसीस थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करुया. आरोग्य क्षेत्रातील एका अहवालानुसार पुरुषांपेक्षा ‌महिलांमध्ये ऑस्ट‌िओपोरोसीस प्रमाण जास्त असतं.

Maharashtra Times 24 Oct 2016, 6:23 am
हल्लीच्या काळात सर्वच वयोगटातील महिला आणि पुरुषांमध्ये हाडांचे विकार वाढत आहेत. खास करुन ऑस्ट‌िओपोरोसीस (सांध्याची झीज)समस्या वाढत आहेत. हा आजार टाळण्यासाठी जास्तीत जास्त जनजागृती होण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर आपण ऑस्ट‌िओपोरोसीस थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करुया. आरोग्य क्षेत्रातील एका अहवालानुसार पुरुषांपेक्षा ‌महिलांमध्ये ऑस्ट‌िओपोरोसीस प्रमाण जास्त असतं. सर्वसाधारणपणे महिलांमध्ये रजोनिवृत्तीनंतर ऑस्ट‌िओपोरोसीस प्रमाण जास्त आढळून येत असलं तरी तरुण महिलांमध्ये हा आजार होण्याचं प्रमाण वाढत आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम arthritis found in women
महिलांमधील सांध्यांचे आजार


ऑस्ट‌िओपोरोसीस होण्याचं कारण म्हणजे शारीरिक हालचालींचा अभाव. शारीरिक हालचाली कमी असतील तेवढा हा आजार होण्याची शक्यता वाढते. महिलांमध्ये प्रामुख्याने रजोनिवृत्तीनंतर हा आजार बळावतो. हा आजार झालेल्या व्यक्तीला थोडेसे जरी शारीरिक श्रम केले तरी प्रचंड थकवा येतो. कार्यक्षमतेतही घट होते. त्या व्यक्तीचा मूड सतत बदलतो, कधी राग अनावर होतो, दैनंद‌नि कामं करण्यास कंटाळा येतो. सुरुवातीच्या टप्प्यात या आजाराच्या लक्षणांमुळे सांधेदुखी, उभे राहाण्यात अडथळे, ताठ बसण्यात अडचणी असे त्रास होतात.

तरुण महिलांमध्ये ऑस्ट‌िओपोरोसीस होण्याचं कारण म्हणजे व्हिटॅमिन आणि लोहाची कमतरता. जंक फूड, शरीराला आवश्यक पोषण द्रव्यांची कमतरता यामुळे अनेक महिलांमध्ये या आजाराचं प्रमाण वाढत आहे. यात हाडांमधील लोह मॅग्नेशिअम, फॉस्फरस या खनिजांचं प्रमाण कमी होऊन या आजाराला आमंत्रण मिळतं. यामुळे हाडं ठिसूळ होतात. हाडांची घनता कमी होते. त्यातून फ्रॅक्चरची शक्यता वाढते. ऑस्ट‌िओपोरोसीसमुळे पाठीचा कणा, कंबर, बरगड्या आणि मनगटामध्ये हाडांच्या फ्रॅक्चरची शक्यता वाढते. या आजाराचा धोका कमी करण्यासाठी लोह आणि ‌व्ह‌टिॅमिन डीचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचं सेवन करावं. तसंच दूध, चीज, दही बटर अशा पदार्थांना दैनंदिन आहारात सार्वधिक प्राधान्य द्यावं. नियमितपणे सूर्यप्रकाशाशी संबंध आल्यास शरीरातली व्हिटॅमिन 'डी'ची पातळी वाढण्यास मदत होते.

डॉ. दिलीप भोसले, अस्थिविकार तज्ज्ञ.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज