अ‍ॅपशहर

कांजण्यांचे व्रण

कांजण्या हा आजार व्हेरिसेला झोस्टर (Varicella Zorter Virus) नावाच्या विषाणूंमुळे होतो. १५ वर्षांच्या वयोगटापर्यंत एकदा तरी बहुतांशी होतो. उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते मेपर्यंत आपल्याकडे प्रामुख्याने कांजण्या आढळून येतात.

Maharashtra Times 17 Mar 2016, 4:00 am
कांजण्या हा आजार व्हेरिसेला झोस्टर (Varicella Zorter Virus) नावाच्या विषाणूंमुळे होतो. १५ वर्षांच्या वयोगटापर्यंत एकदा तरी बहुतांशी होतो. उन्हाळ्यामध्ये जानेवारी ते मेपर्यंत आपल्याकडे प्रामुख्याने कांजण्या आढळून येतात. ऐन परीक्षेच्या काळातच एकाच घरात राहणाऱ्या सर्व भावंडांना त्वचेवरील व्रणांमुळे अथवा श्वसनाद्वारे लागण होते. रुग्णाच्या संपर्कात आल्यास १० ते २१ दिवसांत आजाराची लक्षणे जाणवू लागतात. जंतूसंसर्ग प्रामुख्याने २ दिवस आधी अथवा ६ दिवसांपर्यंत त्वचेची लक्षणे दिसल्यावर होतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम chicken pox in children symptoms treatment
कांजण्यांचे व्रण


सुरुवातीला सातत्याने ताप येणे, डोकेदुखी, मरगळ, कमी भूक लागणे अथवा हलकेसे पोट दुखणे, अस्वस्थता अशी लक्षणे तीन-चार दिवस जाणवतात. त्याचवेळेस त्वचेवर लाल रंगाची अत्यंत खाजवणारी वेदनादायक पुरळ, पुळ्या, त्यामध्ये पाणी भरल्यासारखे फोड आलेले व्रण (Vesicles) दिसायला लागतात. प्रथमत: पाठीवर, छातीवर, खांद्यावर व त्यानंतर चेहरा, डोके व हातापायांवर व्रण येतात. हे फोड साधारणपणे ३०० ते १५००पर्यंत विभिन्न स्वरूपात आढळून येतात. जसा ताप भरतो, तसे फोडही वाढतात. त्यानंतर फोड कोरडे पडतात.

लसीकरण झालेल्या मुलांमध्येही ४२ दिवसांनंतर सौम्य स्वरूपाच्या कांजण्या आढळून येतात. त्यामध्ये ५०पेक्षा कमी फोड व कमी त्रास आढळून येतो. गर्भवती स्त्रीला प्रसूती होण्यापूर्वी पाच दिवस आधी अथवा पश्चात दोन दिवसांनंतर कांजण्या झाल्यास बाळालाही गंभीर स्वरूपाच्या कांजण्या होतात, ज्यामुळे बाळ दगावू शकते. स्त्रीला गर्भधारणेपासून पाच महिन्यांत कांजण्यांचा जंतूसंसर्ग झाल्यास होणाऱ्या बाळातही दुष्परिणाम आढळून येतात. ज्यामध्ये बाळाचे डोके छोटे डोळे, मोतिबिंदू, किडनीस सजू, बाळाचे वजन कमी, न्यूमोनिआ आढळून येते. हातापायांवर अथवा पोटावर ठाराविक व्रण (सायकॅट्रिक्स) येऊन हातापायांची वाढच झालेली नाही असेही दिसते.

डॉक्टरांकडून कांजण्याचे निदान त्वचेवर विभिन्न स्वरूपात असणाऱ्या व्रणांमुळेच होते. रक्ततपासणीची क्वचितच आवश्यकता भासते. रोगप्रतिकारशक्ती कमी झालेल्या रुग्णांमध्ये आजाराचे दुष्परिणाम आढळून येतात. उदाहरणार्थ, न्युमोनिया, शरीरात रक्तस्त्राव होणे, कावीळ, चालताना तोल जाणे, भान हरपणे, झटके, कीडनीस सूज, सांधेदुखी, हतापायास सूज येणे, त्वचा काळी पडणे असे आढळून येते.

यावरील उपचार पद्धती म्हणजे तापाची काळजी घेणे, योग्य प्रमाणात आहार व पाणी घ्यावे. डॉक्टरांशी संपर्क साधून रुग्णाचे गांभीर्य जाणून घ्यावे. यावरील रामबाण उपाय आहे. असायक्लोव्हिर नावाची गोळी अथवा औषध स्वरूपात काहीप्रसंगी इंजेक्शन देण्याचीही गरज पडते. खाज कमी होण्यासाठी इतर काही लोशन्स ऑस्प‌रिीन नावाची गोळी टाळावी. गर्भवती स्त्रीला अथवा बाळाला कांजण्या झाल्यास व्हेरीसेला झोस्टर इम्युनोगोब्युलिनही (VZIG) दिले जाते.

............

लस द्यावी

कांजण्या संपूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्वेचेचे व्रणही निघून जातात. योग्य वेळेत उपचार केल्यास कांजण्या झालेल्या मुलांना साधारणपणे १० दिवस एकत्र येऊ देऊ नये. कांजण्या झालेल्या रुग्णाशी संपर्क आल्यास ३ ते ५ दिवसात कांजण्याची लस घ्यावी. कांजण्या टाळण्यासाठी वय १५ महिन्यानंतर प्रथम लस व पुढील लस ४ ते ६ वर्षे वयोगटात दिली जाते. १३ वर्षाच्या वयोगटानंतर २ लसी १ महिन्याच्या अंतराने दिली जाते.

-डॉ. विनोद शेलार बालरोग तज्ज्ञ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज