अ‍ॅपशहर

स्मार्टफोनच्या अतिवापराचे दुष्परिणाम

सदैव स्मार्टफोन किंवा तत्सम उपकरणांना चिकटून असलेल्या तरुणाईला व्यायाम करणं आणि डाएटचं पालन करणं या अनावश्यक बाबी वाटतात. तिशीच्या आतील अनेक तरुणांचा मृत्यू हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमुळे होत आहे.

Maharashtra Times 19 Jan 2017, 7:34 am
डॉ. अजय शेट्टी, जनरल फिजिशिअन
महाराष्ट्र टाइम्स.कॉम dangers of smartphone overuse
स्मार्टफोनच्या अतिवापराचे दुष्परिणाम


सदैव स्मार्टफोन किंवा तत्सम उपकरणांना चिकटून असलेल्या तरुणाईला व्यायाम करणं आणि डाएटचं पालन करणं या अनावश्यक बाबी वाटतात. तिशीच्या आतील अनेक तरुणांचा मृत्यू हृदयाच्या रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांमुळे होत आहे. याचं कारण म्हणजे तरुणाईने अंगिकारलेली बैठी जीवनशैली. त्यामुळे स्मार्टपोन किंवा टीव्हीपासून दूर जाणं आणि फिट, निरोगी शरीरासाठी शारीरिक हालचाल करणं आवश्यक आहे. आरोग्यदायी जीवनशैलीसाठी काम आणि शिक्षण किंवा कौटुंबिक आयुष्य यांच्यात समतोल साधणं आवश्यक आहे. तेलकट पदार्थ टाळणं आणि आहारामध्ये फळं, भाज्या, प्रथिने आणि योग्य प्रमाणात पाणी घेतल्यामुळे डाएट पाळला जातो. दोन जेवणांमध्ये कमी अंतर ठेवा आणि सकाळी भरपूर आहार घ्या आणि हळुहळू त्याचं प्रमाण कमी करत रात्री एकदम हलका आहार घ्या.

स्मार्ट फोन वापरणाऱ्या पिढीसाठी आरोग्याला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांपासून दूर ठेवणारे किंवा तुम्ही घालवलेल्या कॅलरी आणि तुमच्या शरीराला आवश्यक असलेल्या पाण्याचं सेवन याविषयी तुम्हाला मदत करणारे अनेक अॅप उपलब्ध आहेत. व्यक्तिगत पातळीवर स्मार्टफोनचा यथायोग्य वापर करा. उपकरणांवर रात्री-अपरात्री ब्राउझिंग करू नका आणि किमान ७-८ तास झोप घ्या. वेळेचं व्यवस्थापन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे.

विविध प्रकारचे फिटनेस ट्रेनिंग अथवा जिममध्ये जाण्याऐवजी दर दिवशी ३० ते ४५ ब्रिस्क वॉकिंग करा. अशा प्रकारच्या सवयी तुम्ही महाविद्यालय, ऑफिसला जाताना किंवा येताना स्वत:ला जडवू शकता. आठवड्यातून पाच दिवस स्वत:साठी अशा प्रकारचा एक दिवस दिल्यासही खूप फरक पडू शकतो. तणावमुक्त आणि आरामशीर जीवनशैलीसाठी ७-८ तास झोप आवश्यक आहे. सतत स्मार्टफोनला चिकटून असेल्या तरुणांनी बैठ्या जीवनशैलीचा अंगिकार केल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप परिणाम झालेला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज