अ‍ॅपशहर

व्यसन फास्ट फूडचं

एकविसाव्या शतकात वेगवान आयुष्याच्या नावाखाली माणसाला एक वाईट सवय जडली आहे, फास्ट फूड खाण्याची. चाट, वडापाव आणि बर्गर अगदी कमी वेळात बनवून मिळतो.

Maharashtra Times 30 Aug 2016, 7:31 am
एकविसाव्या शतकात वेगवान आयुष्याच्या नावाखाली माणसाला एक वाईट सवय जडली आहे, फास्ट फूड खाण्याची. चाट, वडापाव आणि बर्गर अगदी कमी वेळात बनवून मिळतो.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fast food
व्यसन फास्ट फूडचं


फास्ट फूड म्हणजे काय?

बेकरी उत्पादनं, आइस्क्रीम, नमकीन पदार्थ, शीतपेयं यांसारखे अन्नपदार्थ, ज्यांमध्ये पोषक तत्त्वांचा अभाव असतो. पण मीठ, फॅट्स आणि कॅलरी जास्त असतात. ते फास्ट फूड. झटपट बनवण्याच्या दृष्टिने रेडी टू इट पदार्थ असतात तेही फास्ट फूड. भरपूर प्रक्रिया केलेले असे हे पदार्थ असतात. त्यामध्ये कर्बोदकं, साखर, घातक फॅट्स आणि मीठ (सोडिअम) मोठ्या प्रमाणात असतात, ते फास्ट फूड.


फास्ट फूड टाळण्यासाठी...

१. सकाळी उठल्यावर पोटभर, प्रोटिनयुक्त पोषक नाश्ता करा.

२. घरातून निघताना जेवणाचा डबा बरोबर घ्या. त्यामुळे फास्ट फूड खाण्याची वेळ येणार नाही.

३. बॅग किंवा कारमध्ये सुकामेवा, फळं ठेवल्यास भुकेच्या वेळी ती पटकन खाता येतील.

४. जेवणाची वेळ चुकवू नका.

ही फास्ट फूड नावाची सवय व्यसनात बदलण्याआधी सावध व्हा.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज