अ‍ॅपशहर

कर्करोग अन् मानसिकता

आजकाल कॅन्सरच्या प्रमाणात आपल्याला चिंताजनक वाढ झालेली दिसते. या करता कुठेतरी आपली बदलती जीवनशैलीदेखील जबाबदार आहे. बैठी कामं, फास्टफूडचं वाढतं प्रमाण, व्यसनाधीनता, व्यायामाचा आभाव, वाढता स्थूलपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला वाढता ताणतणाव.

Maharashtra Times 11 May 2017, 2:15 am
डॉ. राज नगरकर, कर्करोग तज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to prevent cancer
कर्करोग अन् मानसिकता


आजकाल कॅन्सरच्या प्रमाणात आपल्याला चिंताजनक वाढ झालेली दिसते. या करता कुठेतरी आपली बदलती जीवनशैलीदेखील जबाबदार आहे. बैठी कामं, फास्टफूडचं वाढतं प्रमाण, व्यसनाधीनता, व्यायामाचा आभाव, वाढता स्थूलपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला वाढता ताणतणाव.

कॅन्सर म्हटलं की, कोणाच्याही हृदयाचा ठोका चुकतो. आयुष्यावर फुली मारली गेली आहे, असं वाटायला लागतं. आपण कुठे तरी, कुणाला तरी या आजारातून जाताना पाहिलेलं असतं. नाहीतर ऐकलेलं असतं. आजकाल कॅन्सरच्या प्रमाणात आपल्याला चिंताजनक वाढ झालेली दिसते. या करता कुठेतरी आपली बदलती जीवनशैलीदेखील जबाबदार आहे. बैठी कामं, फास्टफूडचं वाढतं प्रमाण, व्यसनाधीनता, व्यायामाचा आभाव, वाढता स्थूलपणा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला वाढता ताणतणाव.

कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरातील पेशींची प्रमाणाबाहेर होणारी वाढ आणि त्यामुळे तयार होणाऱ्या गाठी. पण मग जर हा एक शा‌रीरिक आजार आहे तर त्याचा आपल्या मानसिकतेशी काही संबंध आहे का? हो. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य या संकल्पनेची व्याख्या करताना म्हटलं आहे की, आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणं ही स्थिती अपेक्षित नसून शारीरिक, मानसिक, सामाजिक व अध्यात्मिक अशा चारही अंगांनी आरोग्यपूर्ण असणं होय.

आजाराच्या सुरुवातीपासून उपचाराला प्रतिसाद आणि आजारातून यशस्वीरित्या बाहेर पडण्याकरता रूग्णाची मानसिकता खूप महत्त्वाची असते. शरीराचा आणि मनाचा फार जवळचा संबंध असतो. हेच जाणून घेऊन एकोणिसाव्या शतकात सायको ऑन्कोलॉजी या शास्त्राचा जन्म झाला. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, सायको ऑन्कोलॉजी म्हणजे कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांच्या मानसशास्त्राचा अभ्यास.

कर्करोग कधी कोणाला सांगून होत नाही. तसंच पाहिलं तर कोणताच आजार हा सांगून होत नाही. पण मग कर्करोगाचे निदान झाल्यावरच आपल्याला एवढा धक्का का बसतो? याला बऱ्याच प्रमाणात पूर्वीपासून चालत आलेले गैरसमज जबाबदार आहेत. जसं की, कर्करोग म्हणजे मृत्यू. कर्करोगापेक्षा त्याचे उपचार जास्त भयानक असतात. रेडीओथेरपीमध्ये शरीराला चटके दिले जातात इ. कर्करोगाचे निदान झाल्यावर अनेक प्रश्न मनात येतात. मलाच हा आजार का झाला? मी कोणाचं वाईट केलं होतं, म्हणून मला यातून जावं लागत आहे. माझंच कुठेतरी चुकलं असणार! यामुळे रूग्णाला स्वत:च्या परिस्थ‌तिीचा आणि कधी-कधी देवाचाही राग येतो. रूग्ण आपल्या आजाराला कारणं शोधू लागतो.

कर्करोगाचं निदान झाल्यापासून त्याच्या उपचारांच्या विविध टप्प्यांमध्ये रूग्णाला वेगवेगळ्या तपासण्यांना आणि उपचारपद्धतींना सामोरं जावं लागतं. आजाराची अनिश्चितता आणि उपचारादरम्यान होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रासामुळे रूग्ण आणि त्याच्या नातेवाइकांना ताणतणाव जाणवतो. या तणावामुळे रूग्ण आणि त्याच्या परिवाराच्या विचार, वर्तन व भावनांवर परिणाम रूग्णाला शरीराचा एखादा भाग गमवावा लागू शकतो. त्यामुळे त्याच्या बाह्य रूपाबरोबर त्याच्या स्वप्रतिमेवर देखील आघात होतो. या सगळ्याचा रूग्णाच्या सामाजिक नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम होतो. जेव्हा रूग्ण या ताणतणावाला समर्थपणे तोंड देऊ शकत नाही तेव्हा औदासिन्य, चिंता रोग, तीव्र भीती किंवा निद्रानाश देखील होऊ शकतो. अशा रूग्णांना कर्करोगाच्या उपचाराबरोबर गरजेप्रमाणे समुपदेशन, सायकोथेरपी किंवा औषधोपचार केले जातात.

आजकाल कर्करोगाच्या उपचारासाठी उपलब्ध झालेल्या नवनवीन उपचार पद्धतीमुळे कर्करोगमुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. अशा रूग्णांना त्यांच्या पूर्वव्रत आयुष्याकडे परत जाताना भावनिक व सामाजिक समस्यांना तोंड द्यावं लागतं. त्यामुळे शास्त्रज्ञांचा अभ्यास रूग्णाचा जीव वाचवण्यापासून त्याच्या जीवनाची गुणवत्ता वाढवण्याकडे वळला आहे. यासाठी सायको ऑन्कोलॉजीसारख्या बहुआयामी उपचार पद्धतीचा वापर केला जातो. यामध्ये कर्करोगाच्या रूग्णांबरोबरच त्यांच्या परिवाराला व आजारातून यशस्वीरित्या बाहेर पडलेल्या रूग्णांना भावनिक व मानसिक आधार दिला जातो. रूग्णांना सामाजिक आधार देण्यासाठी आधार गट चालवले जातात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज