अ‍ॅपशहर

अतिन‌ील किरणांचे दुष्परिणाम

डोळे हे आपल्या शरीरातील दोन टक्के जागा घेणारा भाग असला तरी तो एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. पूर्ण शरीरामध्ये डोळे हे एकमेव अवयव आहे ज्यात सूर्यकिरण प्रवेश करतात.

Maharashtra Times 23 May 2017, 3:42 am
डॉ. प्रशांत बिर्ला, नेत्रतज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम how to take care of eyes
अतिन‌ील किरणांचे दुष्परिणाम


डोळे हे आपल्या शरीरातील दोन टक्के जागा घेणारा भाग असला तरी तो एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. पूर्ण शरीरामध्ये डोळे हे एकमेव अवयव आहे ज्यात सूर्यकिरण प्रवेश करतात.

डोळे हे आपल्या शरीरातील दोन टक्के जागा घेणारा भाग असला तरी तो एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. पूर्ण शरीरामध्ये डोळे हे एकमेव अवयव आहे ज्यात सूर्यकिरण प्रवेश करतात. निसर्गाने दिलेल्या या अनमोल देणगीला भुवया आणि पापण्यांच्या माध्यमातून सुरक्षा कवच लाभलेलं आहे. पण हे सुरक्षा कवच डोळ्याचं अतिनील किरणापासून संरक्षण करण्यास असमर्थ ठरतात.

यूव्ही (UV) किरण हे अतिप्रभावशाली आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे, वातावरणामुळे आणि उन्हाळ्यामुळे या अतिनील किरणांचं प्रमाण अनेक पटीने वाढलेलं आहे. जेव्हा-जेव्हा ग्रहण होतात. सूर्यग्रहण, खंड ग्रासग्रहण, चंद्रग्रहण त्यावेळेस यूव्ही किरणाचं प्रमाण अतिशय जास्त असतं. यूव्ही किरणाचे तीन प्रकार असतात.

यूव्ही-सी (UV-C) : हे सर्वात घातक किरण आहेत. पण ओझोन वायूच्या थरामुळे त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत नाही.

यूव्ही-बी (UV-B): हे किरण कमी फिल्टर होतात. त्यामुळे याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. उदा. त्वचेचे अनेक प्रकारचे विकार.

यूव्ही-ए (UV-A): हे किरण UV-B आणि UV-C या किरणापेक्षा कमी प्रभावशाली आहेत म्हणून हे डोळ्याच्या पारदर्शक भागातून मागच्या पडद्यापर्यंत पोहोचू शकतात. या किरणांचे डोळ्यावर दुष्परिणाम जाणवतात.

यूव्ही किरण हे डोळ्याच्या अनेक विकारासाठी जबाबदार ठरतात.

टेरीझम (पडदा): ही डोळ्याच्या काळ्या बुबुळावर येणारी साय आहे. ज्याने दृष्टी कमी होते.

फोटो केरोटायट्स: हा बुबुळाचा आजार आहे. यामध्ये २४ ते ४८ तास डोळ्याची नजर जाते.

मोतीबिंदू: यूव्ही किरणांमुळे तरूण वयात मो‌तीबिंदू होण्यास सुरूवात होते व उतरत्या वयात मोतीबिंदू पिकल्याचं प्रमाण यूव्ही किरणांमुळे वाढतं.

मॅकूला द जनरेशन: हे किरण डोळ्याच्या मागच्या भागापर्यंत पोहोचल्यास कायमस्वरूपी नजर गमवावी लागते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज