अ‍ॅपशहर

प्रसुतीकाळातला संसर्गाचा धोका

बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. याला प्रसूतीनंतर होणारे संसर्ग म्हणतात.

Maharashtra Times 10 Apr 2017, 9:05 am
डॉ. बंदिता सिन्हा, स्त्रीरोगतज्ज्ञ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम infections during pregnancy period
प्रसुतीकाळातला संसर्गाचा धोका


बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. याला प्रसुतीनंतर होणारे संसर्ग म्हणतात.

बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांना संसर्ग होण्याचा धोका असतो. याला प्रसुतीनंतर होणारे संसर्ग म्हणतात. बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांच्या प्रजनन भागात जीवाणूंमुळे संसर्ग होतो. महिलेची सी-सेक्शन डिलेव्हरी झाल्यास योनीमार्गातील घर्षणामुळे संसर्ग होण्याची भीती जास्त असते. सामान्य प्रसूतीत महिलेला दीर्घकाळ श्रम करावे लागल्यास योनीमार्गात संसर्ग होतो.

लगेच प्रसुती होणाऱ्या महिलांच्या तुलनेत, ज्या महिलांच्या प्रसुतीसाठी मदत (असिस्टेड व्हजायनल डिलीव्हरी) घ्यावी लागते, त्यांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. पाणी फुटल्याने जीवाणूंचा धोका संभवतो. योनी मार्गातील हे सूक्ष्मजीव गर्भाशयापर्यंत पोहोचू शकतात आणि त्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते. यामुळे गर्भाशय आणि त्या शेजारील उतींना होणाऱ्या संसर्गाला प्युरपरल सेप्सिस असं म्हणतात. सी-सेक्शन प्रसुतीदरम्यान झालेल्या जखमांची शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेणं आवश्यक असतं. सिझेरिअन प्रसुती झालेल्या महिलांना अधिक श्रम करावे लागल्यास किंवा पडदा फाटल्यास त्यांना एन्डोमेट्रिटिस होण्याचा सर्वाधिक धोका असतो. प्रसुतीनंतर महिलांची रोगप्रतिकारकशक्ती अतिशय कमी असते. त्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांनी प्रसुती झालेल्या महिलेची काळजी घेणं आवश्यक असतं.

नवीन मातांना स्तनांमध्ये संसर्ग होण्याचाही धोका असतो. त्यामुळे दूध पाजत असताना महिलांना त्रास होऊ शकतो. यासोबतच स्तनाग्रांना भेग पडण्याचाही त्रास होऊ शकतो. दूध पाजताना होणाऱ्या त्रासामुळे माता मुलांना दूध पाजणं थांबवू शकतात. त्यामुळे मुलाचे पोषण अपुरे राहू शकते. म्हणून यावर लगेचच उपचार होणं गरजेचं असतं. स्तनपान टाळल्यामुळे साचलेल्या दुधात संसर्ग होण्याचा धोका असतो. असं दूध प्यायल्याने बाळ आजारी पडण्याची भीती असते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज