अ‍ॅपशहर

इम्रान खानची मुक्ताफळं!

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग हे दोघे अद्याप क्रिकेटविश्वातून बाहेर आलेले दिसत नाहीत. तसे नसते तर त्यांनी कर्तारपूर येथील कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली नसती.

Maharashtra Times 30 Nov 2018, 2:00 am
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग हे दोघे अद्याप क्रिकेटविश्वातून बाहेर आलेले दिसत नाहीत. तसे नसते तर त्यांनी कर्तारपूर येथील कार्यक्रमात मुक्ताफळे उधळली नसती. भारत व पाकिस्तान संबंधांविषयी त्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला अशी वक्तव्ये केली आहेत. सिद्धू हा मुळातच विनोदवीर, त्यामुळे त्याला कोणी फारसे गांभीर्याने घेणे अपेक्षित नाहीच. पण इम्रान खान ही तर बडी आसामी आहे. जर्मनी व फ्रान्स वैर विसरून उत्तम संबंध प्रस्थापित करू शकतात तर भारत-पाक का नाही, असा भाबडा प्रश्न विचारून इम्रान यांनी या विषयातील आपली यत्ता दाखवून दिली. याच कार्यक्रमात त्यांनी अत्यंत भावपूर्ण भाषण केले. आपला देश भारताशी संबंध सुधारण्यासाठी किती उत्सुक आहे, याची सफाईही त्यांनी पेश केली. पण, पाकभूमीवरून पोसला जाणारा दहशतवाद निपटून काढून आम्ही पहिले पाऊल टाकतो, असे जर त्यांनी सांगितले असते, तर त्यांच्या वक्तव्यात जरा तरी प्रामाणिकपणा आहे असे वाटले असते. परंतु केवळ भावनिक भाषा करायची, आम्हाला कसे तुमच्याविषयी प्रेम आहे असे सांगावयाचे आणि त्याच कार्यक्रमात खलिस्तानी दहशतवाद्यालाही मानसन्मान द्यायचा, ही दुटप्पी नीती नवी नाही. वाजपेयी व गुजराल या दोन्ही पंतप्रधानांच्या समझोता प्रस्तावाला तत्कालीन पाकिस्तानी नेत्यांनी कसा दहशतवादी प्रतिसाद दिला हे सर्वश्रुत आहेच, शिवाय अलीकडे मोदींनीही थेट नवाज शरीफ यांच्या घरी जाऊन कौटुंबिक नाते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तर त्याची परतफेडही भारतात हल्ले करूनच केली गेली. म्हणूनच आजही काश्मीरमध्ये छुपे युद्ध खेळणाऱ्यांवर विश्वास ठेवणे अशक्य आहे. अमेरिकेच्या मदतकपातीच्या दणक्यामुळेही इम्रानला भारताचा पुळका आला आहे, हे समजू शकते!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran khans controversial statement
इम्रान खानची मुक्ताफळं!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज