अ‍ॅपशहर

नव्या-जुन्यांचा मेळ

सोनिया गांधी यांनी तब्बल १९ वर्षे सांभाळलेली काँग्रेसची धुरा, राहुल गांधी यांच्या हातात दिली. ते पक्षपातळीवर काय क्रांतिकारक बदल करतील, याची चर्चा सुरू असताना, नेमके संसदेचे अखेरचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल यांनी काँग्रेसची बहुप्रतिक्षित कार्यकारिणी जाहीर केली.

Maharashtra Times 19 Jul 2018, 4:00 am
सोनिया गांधी यांनी तब्बल १९ वर्षे सांभाळलेली काँग्रेसची धुरा, राहुल गांधी यांच्या हातात दिली. ते पक्षपातळीवर काय क्रांतिकारक बदल करतील, याची चर्चा सुरू असताना, नेमके संसदेचे अखेरचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी राहुल यांनी काँग्रेसची बहुप्रतिक्षित कार्यकारिणी जाहीर केली. डॉ. मनमोहनसिंग, मोतीलाल व्होरा, गुलामनबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना सोबत घेतानाच ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, हुडा, कुलदीप बिष्णोई यांच्यासारख्या नव्या दमाच्या तरुणांनाही त्यांनी संधी दिली. राहुल गांधी आल्यानंतर काँग्रेसचा सगळा कारभार यंग ब्रिगेडच्या हाती जाईल, अशी जी भीती व्यक्त केली जात होती, तसे काही झाले नाही. एक मात्र झाले की जनार्दन द्विवेदी, दिग्विजयसिंह, कमलनाथ, सुशीलकुमार शिंदे, मोहन प्रकाश, सी. पी. जोशी. ऑस्कर फर्नांडिस यांच्यासारखे दिग्गज घरी बसविण्याचा कठोर निर्णय त्यांनी घेऊन दाखविला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम in rahul gandhis congress working committee a balance of loyalists and younger faces
नव्या-जुन्यांचा मेळ


काँग्रेसमध्ये आजवर आधी वर्किंग कमिटी घोषित व्हायची आणि नंतर कार्यकारिणीला विस्तारित आकार दिला जायचा. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच, एक एक प्रभारी हटविणे सुरू केले होते. दिग्विजय सिंह यांच्यापासून अगदी काल सी. पी. जोशी यांच्याकडून आसामचा पदभार काढेपर्यंतची सगळी कामे त्यांनी आटोपली. ही नेतेमंडळी, प्रभारीपद गेले तरी कार्यकारिणीत असू, या भावनेने गप्प राहिली. नव्या यादीने त्यांना आणखी गप्प केले. महिलांच्या आरक्षणावर प्रभावी भूमिका मांडणाऱ्या काँग्रेसने कार्यसमितीत सोनिया गांधींसह केवळ तीनच महिलांना संधी दिली, पण विस्तारित कार्यकारिणीत सहा महिला आहेत.

महाराष्ट्राचा विचार करता, गांधीपरिवाराचे निकटवर्ती सुशीलकुमार शिंदे यांना मिळालेला निरोप हा मोठा धक्का आहे. कार्यसमितीमधील मुकुल वासनिक आणि अविनाश पांडे हे महाराष्ट्राचे दोन्ही प्रतिनिधी विदर्भाचे आहेत. निमंत्रितांमध्ये बाळासाहेब थोरातांच्या रूपाने पश्चिम महाराष्ट्र, राजीव सातव यांच्या रूपाने मराठवाड्याला प्रतिनिधी मिळाले. ५१ जणांच्या विस्तारित कार्यकारिणीत महाराष्ट्राच्या पाच जणांचा समावेश आहे. महाराष्ट्राला अंदाजे दहा टक्के प्रतिनिधित्व मिळाले आहे. नव्या टीममधील समन्वय, त्यांचे संचलन, यावर परफॉर्मन्स अवलंबून असेल. निवडणुकांच्या तोंडावर निवडलेला नवा संघ, किती ताकदीने खेळेल, किती गोल मारेल हे येत्या काळात दिसेलच.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज